शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

ऋतुजा सातपुतेचे विक्रमी सुवर्णपदक

By admin | Updated: February 9, 2015 02:44 IST

ऋतुजा सातपुतेने सायकलिंग महिलांच्या वैयक्तिक २८ किलोमीटर टाईम ट्रायल प्रकारात प्रथम क्रमांक जिंकून महाराष्ट्राला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक जिंकून दिले.

तिरुअनंतपुरम : ऋतुजा सातपुतेने सायकलिंग महिलांच्या वैयक्तिक २८ किलोमीटर टाईम ट्रायल प्रकारात प्रथम क्रमांक जिंकून महाराष्ट्राला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. दुसरीकडे अभिनंदन भोसलेने पुरुषांच्या १२६ किलोमीटर मास स्टार्ट प्रकारात महाराष्ट्राला कांस्यपदक दिले. शनिवारी झालेल्या वॉटरपोलो प्रकारात महिला संघाने रौप्य आणि पुरुष संघाने कांस्यपदक जिंकले होते. महिलांच्या २८ किलोमीटर वैयक्तिक टाईम ट्रायल प्रकारात प्रत्येक सायकलपटूला १४ किलोमीटरच्या दोन फेऱ्या मारायच्या होत्या. या शर्यतीत ऋतुजाने ४६ मिनिटे ४९. १४५ सेकंदांत पूर्ण करून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्तापित केला. केरळच्या कृष्णनेंदू टी कृष्णाने रौप्य (४८ मि. ०७.९६१ से.), तर महिता मोहनने (४८ मि. २०.३५७ से.) कांस्यपदक जिंकले. त्रिवेंद्रम येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ऋतुजाच्या वडीलांनी पुरुषांच्या १०० मीटर टीम टाईम ट्रायल प्रकारात रौप्यपदक जिंकले होते. पुरुषांच्या १२६ मास स्टार्ट सायकलिंग प्रकारात महाराष्ट्राच्या अभिनंदन भोसलेला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. अभिनंदनने सात किलोमीटरच्या १८ फेऱ्या मारताना ३ तास २६ मिनिटे ३४ सेकंदांची वेळ नोंदविली. या प्रकारात कर्नाटकच्या पंकज कुमारने ३ तास २६ मिनिटे३२ सेकंदांची वेळ नोंदवून सुवर्णपदक, तर कर्नाटकच्याच लोकेशने कांस्यपदक जिंकले. वॉटरपोलो प्रकारात महाराष्ट्राच्या महिलांनी आपल्या गटातील चारपैकी तीन सामने जिंकून रौप्यपदक जिंकले. महाराष्ट्राकडून सायली गुधेकर, वैष्णवी श्रीवास, सई शेट्ये, शलाका धामणगावकर, राजश्री गुगळे, कोमल किरवे, मानसी गावडे, पायल अजमिरे, पूजा कुमारे, स्वप्नाली सूर्यवंशी, निहारिका परीहार, सांजली वानखेडे, पूजा कोसे यांनी कांस्य जिंकताना उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. पुरुषांच्या वॉटरपोलोमध्ये अर्जुन कावळेने चार, सुमित गव्हाणे, उदय उत्तेकर यांचे प्रत्येकी दोन आणि अश्विनीकुमारने केलेल्या एका गोलच्या जोरावर महाराष्ट्राने चुरशीच्या झालेल्या लढतीत पश्चिम बंगाल संघाचा ९-८ असा अवघ्या एका गोलने पराभव करून कांस्यपदक जिंकले. पश्चिम बंगालकडून मोहनने तीन, प्रीतिश दास, सतदीप, अर्जित दास, राजेश शर्मा व सोमनाथ रॉयने प्रत्येकी एक गोल केला. (वृत्तसंस्था)