शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गंभीर, वॉर्नरकडे लक्ष

By admin | Updated: May 17, 2017 19:15 IST

इलिमनेटर सामना आज थोड्याच वेळात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यादरम्यान बंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर सुरू होणार आहे

आॅनलाईन लोकमत

बंगळुरु, दि. 17 - इलिमनेटर सामना आज थोड्याच वेळात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यादरम्यान बंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर सुरू होणार आहे. या सामन्यात गंभीरचे आक्रमक रुप पाहण्यास केकेआरचे फॅन्सउत्सुक असतील. हैदराबादच्या चाहत्यांना प्रतिक्षा असेल ती दुखापग्रस्त युवराज सिंहच्या पुनरागमनाची आणि सोबतच हैदराबादचा कर्णधार आपल्या संघाला विजयपथावर कसा नेतो याकडेही चाहत्यांचे लक्ष असेल. आयपीएलच्या या सत्रातील या हायव्होल्टेज सामन्या केकेआरला पुनरागमनाची प्रतिक्षा आहे. सत्राच्या सुरूवातीला आक्रमक आणि वेगवान वाटणारा हा संघ अखेरच्या काही सामन्यात पराभवाला सामोरे गेलेला आहे. त्यात गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा यांचे अपयश नक्कीच संघासाठी चिंतेचा विषय असेल.सलामीवीर सुनिल नरेन आणि ख्रीस लीन यांच्या दमदार सलामीनंतरही केकेआर अनेकदा मोठी धावसंख्या उभारण्यात किंवा धावांचा पाठलाग करण्यात कमी पडला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची निवड होण्याआधी तडफेने खेळणारागंभीर नंतर काहीसा शांत वाटला. त्याचे मैदानावरचे आक्रमक रुप देखील काहीसे वेगळेच भासले. हैदराबादविरुद्ध पहिला सामना जिंकणाऱ्या केकेआरला दुसऱ्या सामन्यात हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला. विजय शंकर या नवोदित खेळाडूनेकेकेआरच्या गोलंदाजीची पिसे काढली. केकेआरच्या गोलंदाजांना वॉर्नर आणि धवनपासून सावध रहावे लागेल. त्यासोबतच मोझेस हेन्रीक्सही आहेच. युवराज सिंहचा फिट असला तर तो कोलकात्याच्या गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरु शकतो.या आधीही त्याने या सत्रात मोठी खेळी केली आहे. केकेआरच्या गोलंदाजीची मदार ही प्रामुख्याने फिरकीवर अवलंबून असेल.चायनामन कुलदीप यादव, पियुष चावला, सुनिल नरेन हे फिरकीचे प्रमुख अस्त्र आहे. तर कुल्टर नाईल, डी ग्र्राण्ड होम, उमेश यादव, ट्रेंट बोल्ड हे जलदगती गोलंदाजही केकेआरच्या दिमतीला आहे. या महत्त्वाच्या सामन्यात केकेआरचे संघ व्यवस्थापन आणि गंभीर कुणाला साथ देतात हे पाहणे रंजक ठरेल.हैदराबादची गोलंदाजी ही आयपीएलमधील सर्वात प्रभावी गोलंदाजी समजली जाते. भुवनेश्वर कुमारकडे पर्पल कॅप आहे. अफगाणचा युवा फिरकीपटू राशिद खान याने आतापर्यंत प्रभावी कामगिरी केली आहे. तर मोहम्मद सिराज याने गेल्यासामन्यात गुजरात लायन्सविरोधात केलेल्या भेदक माऱ्याकडे गंभीर नक्कीच दुर्लक्ष करणार नाही. या सामन्यातील विजयी संघ क्वालिफायर २ मध्ये मुंबई इंडियन्स विरोधात लढेल. मंगळवारच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पुण्याकडून पराभव पत्करावालागला आहे. त्यामुळे आता अखेरची फेरी गाठण्यासाठी मुंबईला दुसऱ्या क्वालिफायरमध्ये खेळावे लागेल. त्यांच्याविरोधात केकेआर विरुद्ध हैदराबाद यांच्यातील विजेता संघ लढेल.