शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सेरेनास्लॅम!

By admin | Updated: July 12, 2015 03:56 IST

महिला टेनिस विश्वात दबदबा निर्माण करणाऱ्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने ‘विम्बल्डन’वर आपलेच राज असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले.

लंडन : महिला टेनिस विश्वात दबदबा निर्माण करणाऱ्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने ‘विम्बल्डन’वर आपलेच राज असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. स्पर्धेच्या एकेरीतील अंतिम सामन्यात तिने स्पेनच्या गार्बिन मुगूरुजावर एकतर्फी मात करीत सहाव्यांदा विम्बल्डन चषक पटकाविला. एवढेच नव्हे, तर कारकीर्दीतील तिचे हे २१ वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद ठरले. त्यामुळे ग्रॅण्डस्लॅमवर सध्यातरी सेरेनाचेच वर्चस्व दिसून येते. चारही ग्रॅण्डस्लॅम जिंकणाऱ्या शर्यतीत ती सर्वात आघाडीवर आहे. याआधी सेरेनाने २००२-०३ मध्येही सुद्धा हा प्रताप केला होता. या वर्षी आॅस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डनचा मुकूट पटकाविणाऱ्या सेरेना आता अमेरिकन ओपनचा किताबही जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. तिने हा किताबही पटकािवला तर ती १९९८ मध्ये स्टेफी ग्राफ हिच्यानंतर कॅलेंडर ग्रॅण्ड पूर्ण करणारी पहिली खेळाडू ठरेल. सामन्यात, सरेनाने संथ आणि संयमी सुरुवात केली होती. त्यानंतर मात्र आक्रमक खेळ करीत सेरेनाने २० व्या मानांकित मुगूरुजा हिचा सरळ सेटमध्ये म्हणजे ६-४, ६-४ ने पराभव करीत विजेतेपद पटकाविले. हा सामना एक तास २२ मिनिटांपर्यंत चालला. विजयानंतर सेरेना म्हणाली, निश्चितच सुवर्ण क्षण आहे. गार्बिनने सुद्धा चांगला खेळ केला. अखेरच्या क्षणामध्ये तिने चांगली टक्कर दिली. तिच्यासोबत खेळताना सामना कधी संपला हे कळले नाही. मला विश्वास आहे, की ती सुद्धा विम्बल्डन चषक जिंकेल. (वृत्तसंस्था)