शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
3
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
4
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
6
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
7
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
8
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
9
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
10
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
11
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
12
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
13
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
14
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
15
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
16
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
17
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
18
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
19
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
20
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!

सेरेनाची स्वप्नपूर्ती

By admin | Updated: June 7, 2015 14:34 IST

टेनिस कारकिर्दीत २० वा ग्रॅण्डस्लॅम पटकाविणे म्हणजे एक स्वप्नच. ही स्वप्नपूर्ती प्रत्यक्षात उतरविली ती अमेरिकेच्या सेरेना

पॅरिस : टेनिस कारकिर्दीत २० वा ग्रॅण्डस्लॅम पटकाविणे म्हणजे एक स्वप्नच. ही स्वप्नपूर्ती प्रत्यक्षात उतरविली ती अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने. महिला एकेरीत जगात पहिल्या क्रमांकावर असलेल्या या टेनिसपटूने चेक प्रजासत्ताकाच्या लुसी सफारोव्हाचा पराभव करीत फ्रेंच ओपनचा किताब पटकाविला. हा अंतिम सामना तिने ६-३, ६-७, ६-२ ने जिंकला. फ्रेंच ओपनचा एकेरीतील हा तिचा तिसरा किताब आहे. अव्वल मानांकित सेरेनाने पहिला सेट जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही आघाडी मिळवली होती. त्यानंतर पहिल्यादांच ग्रॅण्डस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या लुसीने शानदार पुनरागमन केले. सेरेनाची खराब सर्व्हिस आणि लुसीचा शानदार खेळ यांमुळे हा सामना तिसऱ्या सेटपर्यंत गेला. त्यानंतर सेरेना तिसऱ्या तसेच निर्णायक सेटमध्ये ०-२ अशी पिछाडीवर गेली होती. त्यानंतर तिने सलग सहा गेम जिंकत किताब आपल्या नावे केला. याबरोबरच अमेरिकेच्या सेरेनाने एका वर्षात चार ग्रॅँडस्लॅमची विजेतीपदे पटकाविण्याकडे वाटचाल केली आहे. याआधी, तीन महिला खेळाडू एका वर्षांत चार ग्रॅण्डस्लॅम जिंकण्यात यशस्वी ठरल्या आहेत. स्टेफी ग्राफने १९८८ मध्ये हा विक्रम साधला होता. या पराभवानंतर लुसीने महिला मानांकनात पहिल्या दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे. ही तिच्यासाठी समाधानकारक बाब ठरली.दुसरीकडे, सेरेनाचे आता पुढील लक्ष्य विम्बल्डन स्पर्धा जिंकण्याचे असेल. एकाच वेळी चारही ग्रॅण्डस्लॅम आपल्याकडे राखण्याचा तिचा प्रयत्न असेल. याआधी, २००३ मध्ये आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकत तिने ही किमया केली होती. (वृत्तसंस्था)विक्रमाकडे...-सेरेनाचे हे कारकिर्दीतील २० वे ग्रॅण्डस्लॅम. या जेतेपदानंतर ती आता स्टेफी ग्राफच्या दोन पावले मागे आहे. स्टेफीने २२ ग्रॅण्डस्लॅम पटकावली आहेत. सेरेनाची ही कारकिर्दीतील २४वी ग्रॅण्डस्लॅम फायनल होती. उल्लेखनीय म्हणजे, तिने केवळ चार वेळा अंतिम सामना गमावला आहे. -यात दोनदा सेरेना बहीण व्हीनसकडून पराभूत झाली होती. याशिवाय, मारिया शारापोव्हा आणि समंता स्टोसूर यांनी तिच्यावर प्रत्येकी एकदा विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या सत्रात फिट नसतानाही सेमीफायनलच्या मुकाबल्यात तिने टिमिया बसिंस्कीविरुद्धचा पहिला सेट गमावल्यानंतरही पुनरागमन केले होते.