शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
2
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
3
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
4
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
5
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
6
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
7
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
8
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
9
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
10
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
11
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
12
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

सेरेना विलियम्सची विजयी सलामी

By admin | Updated: August 31, 2016 19:47 IST

विम्बल्डन चॅम्पियन अ‍ॅण्डी मरे आणि महिला गटातील अव्वल खेळाडू सेरेना विलियम्स यांनी आपआपल्या गटात सहजपणे विजयी सलामी देताना यूएस ओपन ग्रण्डस्लॅम

ऑनलाइन लोकमत

न्यूयॉर्क, दि. 31 - विम्बल्डन चॅम्पियन अ‍ॅण्डी मरे आणि महिला गटातील अव्वल खेळाडू सेरेना विलियम्स यांनी आपआपल्या गटात सहजपणे विजयी सलामी देताना यूएस ओपन ग्रण्डस्लॅम स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. दोघांनीही एकतर्फी झालेल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवताना आपल्या प्रतिस्पर्ध्यांना प्रतिकार करण्याची संधीही दिली नाही.गेल्या काही काळापासून डाव्या खांद्याच्या दुखापतीशी झगडत असलेली सेरेना यावेळी पुर्ण तंदुरुस्त दिसली. केवळ ६३ मिनिटांमध्ये तीने सामना जिंकताना १२ एस आणि २७ विनर शॉट मारत जागतिक क्रमवारीत २९व्या स्थानी असलेल्या रशियाच्या एकाटेरिना मकारोवाला ६-३, ६-३ असे नमवले.विशेष म्हणजे, गेल्या काही स्पर्धांपासून सेरेनाला ग्रॅण्डस्लॅम जिंकण्यासाठी चांगलेच झुंजावे लागत आहे. त्याचवेळी दुसरीकडे दुसरे विम्बल्डन जिंकल्यानंतर ब्रिटनच्या अ‍ॅण्डी मरेने दिमाखात सलग दुस-यांदा आॅलिम्पिक गोल्ड पटकावले. त्याचप्रमाणे, ओपन युगात एकाचा कॅलेंडर वर्षात चारही ग्रॅण्डस्लॅमची अंतिम फेरीत गाठणाºया चौथ्या खेळाडूचा मान मिळवण्याची संधीही मरेकडे आहे. मरेने देखील आपल्या लौकिकानुसार दणदणीत विजय मिळवताना झेक प्रजासत्ताकच्या लुकास रोसोलचा ६-३, ६-२, ६-२ असा धुव्वा उडवला.त्याचप्रमाणे, विक्रमी ७२व्यांदा मुख्य स्पर्धेत खेळणारी सेरेनाची मोठी बहीण व्हीनसने देखील दुसरी फेरी गाठली. मात्र यासाठी तीला तीन सेटपर्यंत झुंजावे लागले. युक्रेनच्या कॅटरीना कोजलोवाचा ६-२, ५-७, ६-४ असा पाडाव करुन व्हीनसने आगेकूच केली. व्हीनसने आपल्या २२ वर्षीय प्रतिस्पर्धी विरुद्ध ६३ माफक चूका केल्या. मात्र, तरीही तीने विजयी कूच केली. त्याचवेळी व्हीनसने ४६ शानदार विनर शॉटही खेळले. अन्य सामन्यात, पोलंडची चौथी मानांकीत एग्निएज्का रदवांस्काने सहज विजयी सलामी देताना अमेरिकेच्या जेसिका पेगुलाचा ६-१, ६-१ असा फडशा पाडला. तर, पाचव्या मानांकीत रोमानियाच्या सिमोना हालेपने आक्रमक खेळाच्या जोरावर बेल्जियमच्या कर्स्टन फ्लिपकेंसला ६-०, ६-२ असे लोळवले.  पुरुषांमध्ये दोनवेळा उपांत्य फेरी गाठणाºया स्वित्झर्लंडचा तिसरा मानांकीत स्टेन वावरिंकाने स्पेनच्या फर्नांडो वर्दास्कोला ७-६, ६-४, ६-४ असे नमवले. तर, २०१४ साली अंतिम फेरी गाठणारा पहिला आशियाई खेळाडू जपानच्या केई निशिकोरीनेही अपेक्षित आगेकूच करताना जर्मनीच्या बेनजामिन बेकरला ६-१, ६-१, ३-६, ६-३ असा धक्का दिला. या स्पर्धेत विश्वविक्रम नोंदवण्याची संधी असलेली सेरेना जर जेतेपद पटकावण्यात यशस्वी झाली, तर ओपन युगामध्ये सर्वाधिक २२ ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदांचा विक्रम सेरेना आपल्या नावे करेल. सध्या सेरेनाने स्टेफी ग्राफच्या २१ विजेतेपदांची बरोबरी साधली असून दिग्गज खेळाडू मार्गारेट कोर्टने सर्वाधिक २४ ग्रॅण्डस्लॅम जिंकले आहेत.