शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आई बनल्यानंतर सेरेना कोर्टवर परतणार

By admin | Updated: April 27, 2017 00:47 IST

दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्स आई बनल्यानंतर कोर्टवर पुनरागमन करणार आहे. माझे बाळ माझी प्रेरणा बनेल, असा आशावाद सेरेनाने व्यक्त केला.

व्हँकूवर : दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्स आई बनल्यानंतर कोर्टवर पुनरागमन करणार आहे. माझे बाळ माझी प्रेरणा बनेल, असा आशावाद सेरेनाने व्यक्त केला.काल एका खुल्या चर्चासत्रात सेरेनाने दिलखुलास गप्पा केल्या. ती म्हणाली,‘गर्भावस्थेची प्रगती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी मी दर आठवड्याला फोटो घेण्याची सवय लावून घेतली आहे. हे एक प्रकारचे दस्तावेज ठरावेत. त्यातच एक दिवस सोशल मीडियावर स्वीम सूटमध्ये चुकीने फोटो पोस्ट केला होता. तो फोटो पोस्ट होईस्तोवर मी आई बनणार हे काही लोकांनाच माहिती होते.’सोशल मीडियावर काय घडते, असे हसून सांगताना सेरेना पुढे म्हणाली,‘मी चुकीचे बटन दाबले आणि जगभर चर्चा सुरू झाली. मी आधी गुप्तता पाळली होती, पण एक चूक नडली आणि खुलासा झाला. मी गर्भवती आहे हे आॅस्ट्रेलियन ओपनच्या दोन दिवसांआधी कळले. वर्षातील पहिले ग्रॅण्डस्लॅम जेतेपद पटकविले होते. खेळत राहणे हे माझ्यासाठी आणि बाळासाठी किती धोकादायक असू शकते याची कल्पना नसल्याने मी नर्व्हस होते. थकवा आणि तणाव स्वत:वर हावी होऊ न देता मी वेगळ्या डावपेचानुसार खेळले. मी स्पर्धा जिंकावी, अशी अनेकांची इच्छा होती. मी आई बनणार आहे हे यापैकी काहींनाच माहिती होते.’सेरेनाने जानेवारीत आॅस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये मोठी बहीण व्हीनस विल्यम्सला नमवून जेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते. याविषयी ती म्हणाली,‘व्हीनसविरुद्ध खेळणे म्हणजे स्वत:विरुद्ध खेळण्यासारखेच आहे. कोर्टवर आम्ही एकमेकींच्या कडव्या प्रतिस्पर्धी आहोत. कोर्टबाहेर मात्र आमच्यात मैत्रिणीसारखे नाते आहे.’‘मला हरणे पसंत नाही. मी नेहमी जिंकू इच्छिते. पण पराभव मिळाला तर त्यातून शिकण्यासारखे बरेच काही असते. भविष्यात चुकांची पुनरावृत्ती करू नका, असा संदेश पराभव देत असतो,’ असे सेरेनाने एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.सेरेना सप्टेंबर महिन्यात आई बनेल. त्याच महिन्यात ती वयाची ३६ वर्षे पूर्ण करणार आहे. टेनिसमधील भविष्याबाबत ती म्हणाली,‘मी निश्चितपणे पुनरागमन करणार आहे. बाळ स्टॅन्डमध्ये राहील. ते रडणार नाही व मला प्रोत्साहन देईल, अशी अपेक्षा आहे.’ सेरेनाने गत सप्टेंबरमध्ये व्यावसायिक अ‍ॅलेक्सिस ओवाहनियन याच्यासोबत वाङ्निश्चय झाल्याची घोषणा केली होती. यंदा सेरेना कुठल्याही स्पर्धेत खेळली नाही. भावी आयुष्यात बाळ, फिटनेस, टेनिस, तसेच फॅशन व्यवसाय या सर्वांवर लक्ष केंद्रित करायचे असल्याचे सेरेनाने सांगितले. (वृत्तसंस्था)