लंडन : लहान बहीण व्हीनसचे आव्हान तिस:या फेरीत संपुष्टात आल्यानंतर अव्वल मानांकित सेरेना विलियम्सचाही विम्बल्डनमधील प्रवास तिस:या फेरीतच संपला. तिला फ्रान्सच्या 25व्या मानांकित अॅलीज कॉर्नेटने 1-6, 6-3, 6-4 असा सहज धक्का दिला.
पावसाच्या व्यत्ययामुळे उशिरा सुरू झालेल्या या सामन्याचा निकाल लवकर लावण्याची घाई सेरेनाला होती. तिने पहिला सेट जिंकून ती दाखवूनही दिली, परंतु कॉर्नेटच्या अप्रतिम खेळाचे उत्तर सेरेनाला सापडतच नव्हते. एकीकडे सामना संपविण्याच्या घाईत असलेली अमेरिकेची स्टार सेरेना कोणताही विचार न करता खेळताना दिसत होती आणि त्याचाच फायदा घेत कॉर्नेटने अगदी चतुर खेळ करून एक एक पॉइंटची जमवाजमव केली. तिचा हा चतुर खेळ सेरेनालाही समजला नाही आणि कॉर्नेटने दुसरा व तिसरा सेट सहज जिंकून बाजी मारली. महिला गटात रशियाच्या मारिया शारापोव्हाने अमेरिकेच्या अॅलिसन रिस्केचा 6-3, 6-क् असा अवघ्या 1 तास 9 मिनिटांत पराभव करून चौथ्या फेरीत ऐटीत प्रवेश केला. तिला पुढील फेरीत कॅनडाच्या इगेनीए बोचार्ड हिच्याशी मुकाबला करावा लागेल. (वृत्तसंस्था)
124 मिनिटे चाललेल्या या लढतीत पहिला सेट वगळता सेरेनाला फार काही चमक दाखविता आली नाही.
05वेळा सेरेनाला कॉर्नेटकडून पराभव पत्करावा लागला असून, 2क्14 मधील तिच्याविरुद्धचा दुसरा पराभव आहे.
2006सालानंतर पहिल्यांदाच सेरेना आणि व्हीनस या दोघी बहिणींना अंतिम 16 जणांमध्ये स्थान पटकावण्यात अपयश आले आहे.
लिएंडर पेस-स्टेपनेकचा संघर्ष
यशस्वी; सानिया-कारा आऊट
लिएंडर पेस आणि राडेक स्टेपनेक या जोडीने पुरुष दुहेरीत दुस:या फेरीत केलेला संघर्ष यशस्वी ठरला, तर दुसरीकडे महिला दुहेरीत सानिया मिङर आणि कारा ब्लॅक या जोडीला स्पध्रेबाहेर जावे लागले. भारताचा पेस आणि झेक प्रजासत्ताकच्या स्टेपनेक या पाचव्या मानांकित जोडीने तीन तास चाललेल्या लढतीत मॅक्सिकोच्या सेंटिएगो गोंजालेस व अमेरिकेच्या स्काट लिप्स्की यांचे आव्हान 3-6, 6-1, 3-6, 6-3, 11-9 असे परतवले. सानिया आणि जिम्बाब्वेच्या कारा या चौथ्या मानांकित जोडीला रुसच्या अनास्तासिया पावलीचेनकोवा व झेक प्रजासत्ताकच्या लुसी सफारोवा जोडीने 6-2, 6-7, 4-6 असे पराभूत केले.
‘मला विश्वास बसत नाही’, अशी प्रतिक्रिया विजयानंतर कॉर्नेटने दिली. ती म्हणाली, पावसाच्या व्यत्यायानंतर जेव्हा कोर्टवर खेळण्यासाठी आले त्या वेळी माझा पाय हलत नव्हता. पहिला सेट अवघ्या 15 मिनिटांत पराभूत झाल्यानंतर ही लढत किचकट होईल असे वाटले होते, परंतु अखेर मी बाजी मारली.
सेरेनाचा पराभव शारापोव्हाच्या पथ्यावर !
जेतेपदाची प्रबळ दावेदार असलेल्या सेरेना विलियम्सच्या पराभवामुळे रशियाच्या मारिया शारापोव्हासमोरील प्रमुख अडसर दूर झाला आहे. त्यामुळे मारियाचा जेतेपदाचा मार्ग अधिक सुकर झाला असून तिच्याकडेच यंदाच्या विम्बल्डनचा ताज जाईल, असा कयास बांधला जात आहे.
राफेल नदाल आणि रॉजर फेडरर या दिग्गजांनी आगेकूच कायम राखत चौथ्या फेरीत प्रवेश मिळवला. नदालने कजाकस्तानच्या मिखाइल कुकूशकीनचा 6-7 (4-7), 6-1, 6-1, 6-1 असा, तर फेडररने कोलंबियाच्या सैंटियागो गिराल्डोचा एक तास 21 मिनिटे चाललेल्या लढतीत 6-3, 6-1, 6-2 असा पराभव करून अंतिम 16 जणांमध्ये स्थान पक्के केले.