शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

सेरेना, जोकोविच यांना अव्वल मानांकन

By admin | Updated: August 27, 2015 03:35 IST

जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सेरेना विल्यम्स आणि पुरुषांत सर्बियाचा नोव्हाक जोकोविच हे ३१ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या चौथ्या आणि अखेरच्या ग्रँडस्लॅम

न्यूयॉर्क : जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सेरेना विल्यम्स आणि पुरुषांत सर्बियाचा नोव्हाक जोकोविच हे ३१ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या चौथ्या आणि अखेरच्या ग्रँडस्लॅम अमेरिकन ओपन टेनिस (यूएस) स्पर्धेत अव्वल मानांकित खेळाडू असतील.सेरेना आपल्या घरच्या मैदानावर सोमवारपासून सुरू होणाऱ्या यूएस ओपनमध्ये २७ वर्षांनंतर प्रथमच कॅलेंडर ग्रँडस्लॅम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवून खेळेल. महिला एकेरीत सेरेनाने या वर्षीच्या तिन्ही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत आणि तिला अव्वल मानांकन देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे २०१४ची फ्रेंच ओपन उपविजेती रुमानियाची सिमोना हालेप द्वितीय मानांकित खेळाडू असेल. ताज्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर घसरण झालेली २००६ची यूएस ओपनविजेती रशियाची मारिया शारापोव्हा हिला तृतीय मानांकन देण्यात आले आहे. तसेच, २०१४ची यूएस ओपनउपविजेती डेन्मार्कची कॅरालिन वोझ्नियाकी चौथी मानांकित खेळाडू असेल. पाच वेळांचा यूएस ओपन चॅम्पियन स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला पुरुष एकेरीत द्वितीय मानांकन देण्यात आले आहे. पुरुष गटात या वेळेसचा मुकाबला खूप संघर्षपूर्ण ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येथे अव्वल १० मानांकित खेळाडूंत ५ यूएस ओपन चॅम्पियन आणि सहा गँ्रडस्लॅम चॅम्पियन खेळणार आहेत. त्यात २०११चा यूएस ओपन चॅम्पियन सर्बियाचा नोव्हाक जोकोविच याला अव्वल मानांकन देण्यात आले. त्याचबरोबर, २००४ आणि २००८चा विजेता फेडरर द्वितीय मानांकित खेळाडू असेल, तसेच २०१२चा विजेता ब्रिटनचा अँडी मरे, २०१० आणि २०१३चा चॅम्पियन स्पेनचा राफेल नदाल आणि गेल्या वर्षीचा चॅम्पियन क्रोएशियाचा मारिन सिलीच यांचा अव्वल १० मानांकित खेळाडूंमध्ये समावेश आहे. (वृत्तसंस्था)