शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

पत्रकारितेतला "अष्टपैलू खेळाडू" हरपला; ज्येष्ठ पत्रकार अनिल जोशी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 14:20 IST

गेले वर्षभर अनिल जोशी यांची प्रकृती ढासळत चालली होती, तरीही त्यांनी आपले क्रीडा विषयक लिखाण थांबवले नव्हते.

पत्रकारितेत सर्व विषयांवर सहजपणे परखड लिखाण करणारे अष्टपैलू पत्रकार, आपला वार्ताहरचे क्रीडा संपादक आणि सर्व देशी खेळांना न्याय देणारे ज्येष्ठ पत्रकार अनिल जोशी यांचे आज पहाटे 4 वाजता निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी नैला आणि मुलगा प्रसाद असा परिवार आहे. 

गेले वर्षभर अनिल जोशी यांची प्रकृती ढासळत चालली होती, तरीही त्यांनी आपले क्रीडा विषयक लिखाण थांबवले नव्हते. 8 डिसेंबरला त्यांनी क्रीडाक्षेत्रातही भावनेचा उद्रेक हा आपल्या "क्रीडाक्षेप" या सदरात लेख लिहिला. तो त्यांचा अखेरचा लेख ठरला. त्यांनी आपला वार्ताहरच्या गेल्या 14 वर्षांच्या कारकिर्दीत "क्रीडाक्षेप" सदरात 4 हजारांपेक्षा अधिक लेख लिहिले आहेत. हा क्रीडा पत्रकारितेतील एक विक्रमच म्हणावा लागेल.1975 सालापासून सकाळमधून सुरू झालेली पत्रकारिता 44 वर्षानंतरही अविरतपणे त्याच झपाट्याने सुरू ठेवणारे ज्येष्ठ पत्रकार आणि आताचे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार म्हणजेच अनिल जोशी. हीच त्यांची खरी ओळख. त्यांना पत्रकारितेतून निवृत्त व्हायचे होते, पण त्यांच्या प्रकृतीनेच त्यांना दगा दिला आणि निवृत्तीआधीच त्यांना मुक्त केले. जोशी यांच्या आकस्मिक निधनाने क्रीडाक्षेत्राची अपरिमित हानी झालीच आहे, पण देशी खेळांना आपल्या लिखाणाने न्याय मिळवून देणारा आपला माणूस हरपल्याची भावना उमटली आहे.

वेगवेगळ्या बीटच्या वार्तांकनाची जबाबदारी सोपविण्यात आली अशा अनिल जोशींनी पत्रकारितेतील एकही क्षेत्र सोडले नाही. व्यापारापासून सिनेमापर्यंत, राजकारणापासून खेळापर्यंतचे सारे क्षेत्र त्यांनी अक्षरश: पिंजून काढले. 44 वर्षांच्या दीर्घ कालखंडात मुंबई सकाळ आणि लोकसत्ता या दोन लोकप्रिय दैनिकांमध्ये या अवलियाची कारकीर्द बहरली. त्यानंतर त्यांनी नवशक्ती, सामनासह अनेक दैनिकांमध्ये वृत्त संपादक ते सहसंपादकपर्यंत अनेक संपादकीय जबाबदारी सक्षमपणे पार पाडली. मात्र त्यांनी आपला वार्ताहर दैनिकात क्रीडा विभागाचे आव्हान स्वीकारल्यानंतर सुरू केलेले क्रीडा लिखाण चौदा वर्षानंतरही अविरतपणे कायम होते. 

आजवर त्यांनी सातत्यपूर्ण चार हजारांपेक्षा अधिक क्रीडा लेख आणि मुलाखती आपल्या सदरात प्रसिद्ध केल्या. हा एक प्रकारे विक्रमच म्हणावा लागेल. त्यांनी आपल्या निर्भीड शैलीतून अनेकांची कारकीर्द रूळावर आणली तर अनेकांना सोलूनही काढले. त्यांच्या लिखाणाचा अनेकांनी धसकासुद्धा घेतला. कुस्ती, कबड्डी, शरीरसौष्ठव, मल्लखांब, खो-खोसारख्या खेळांवर त्यांनी इतकं प्रचंड लिखाण केलंय की त्या लेखांना एकत्रित केलं तर त्यांचे अक्षरश: खंड होतील. वयाच्या सत्तरीतही वेड्यासारखं भन्नाट क्रीडा लिखाण करणाऱ्या या पत्रकाराचा मराठी क्रीडा पत्रकार संघाच्या वतीने नुकताच जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान केला होता. गेल्या 14 वर्षात त्यांना युआरएल फाऊंडेशन, विचारे प्रतिष्ठानसह किमान 18 संस्थानी त्यांचा गौरव केला आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई