क्रीडा पत्रकार संघटनेतर्फे चर्चासत्र
By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST
पणजी : भारतीय हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांचा जन्मदिवस क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त गोवा क्रीडा पत्रकार संघटनेतर्फे शनिवारी (दि.29) र्शमशक्ती भवन-पाटो पणजी येथे सकाळी 11 वाजता गोवा पत्रकार संघटनेच्या कार्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी गोवा ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव गुरुदत्त भक्ता ‘गोवा आणि राष्ट्रीय स्पर्धा’ या विषयावर पत्रकांराशी चर्चा करतील. या वेळी भारताचे माजी फुटबॉलपटू ब्रम्हानंद शंखवाळकर हेसुद्धा उपस्थित असतील, असे संघटनेतर्फे कळविण्यात आले आहे.