शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बडोदा, तामिळनाडू उपांत्य फेरीत

By admin | Updated: March 13, 2017 03:28 IST

कृणाल पंड्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बडोदा संघाने विजय हजारे करंडक वन-डे क्रिकेट स्पर्धेत फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये रविवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या

नवी दिल्ली : कृणाल पंड्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बडोदा संघाने विजय हजारे करंडक वन-डे क्रिकेट स्पर्धेत फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये रविवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्यपूर्व लढतीत कर्नाटकचा ७ गडी राखून पराभव केला. आता बडोदा संघाची उपांत्य फेरीत गाठ तामिळनाडू संघासोबत पडणार आहे.कर्नाटकने दिलेल्या २३४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बडोदा संघाने सालमीवीर केदार देवधर (७८) व पंड्या (७०) यांच्या वैयक्तिक अर्धशतकांच्या जोरावर विजयासाठी आवश्यक धावा ४५.५ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. जाधव व पंड्या यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी केली. दीपक हुड्डाने नाबाद ३४ धावांचे योगदान दिले. देवधरने ९८ चेंडूंना सामोरे जाताना ६ चौकार व २ षटकार ठोकले. पंड्याने ७९ चेंडूंच्या खेळीमध्ये ५ चौकार व १ षटकार लगावला. त्याआधी, पवन देशपांडे (५४), रवी समर्थ (४४) व मयंक अग्रवाल (४०) यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानानंतरही कर्नाटकचा डाव ४८.५ षटकांत २३३ धावांत संपुष्टात आला. बडोदा संघातर्फे पंड्या सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ६ षटकांत ३२ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. इरफान पठाण, अतीत सेठ, लुकमान मेरीवाला व स्वप्नील सिंग यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. बडोदा संघाला उपांत्य फेरीत तामिळनाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. पालम मैदानावर आज खेळल्या गेलेल्या दुसऱ्या उपांत्यपूर्व लढतीत तामिळनाडूने गुजरातचा ५ गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या गुजरात संघाचा डाव ४९.४ षटकांत २११ धावांत संपुष्टात आला. तामिळनाडूतर्फे विजय शंकर (३-४८), राहिल शाह (२-३४) व आर. साई किशोर (२-३५) यांची गोलंदाजीतील कामगिरी उल्लेखनीय ठरली.गुजरात संघातर्फे रुजुल भटने सर्वाधिक नाबाद ८३ धावांची खेळी केली. त्याने ९८ चेंडूंना सामोरे जाताना ५ चौकार व २ षटकार लगावले. सलामीवीर समित गोहेलने ३९ धावांचे योगदान दिले. त्याला चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करता आली नाही. प्रत्युत्तरात खेळताना सलामीवीर व्ही. गंगा श्रीधर राजू (८५) याच्या खेळीच्या जोरावर तामिळनाडूने विजयासाठी आवश्यक धावा ४६ चेंडू व ५ गडी राखून पूर्ण केल्या.श्रीधर राजूने ९५ चेंडूंना सामोरे जाताना १२ चौकार लगावले. बाबा अपराजितने ३४ धावांचे योगदान दिले तर एम. मोहम्मदने ३३ चेंडूंमध्ये ३ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ३५ धावा केल्या. बडोदा व तामिळनाडू संघांदरम्यान उपांत्य फेरीची लढत १६ मार्च रोजी फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये रंगणार आहे. (वृत्तसंस्था)