शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई संघाच्या प्रशिक्षकाची निवड २ जूनला होणार

By admin | Updated: May 31, 2017 03:18 IST

मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) मंगळवारी घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये विविध वयोगटाच्या संघासाठी प्रशिक्षक नेमले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) मंगळवारी घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये विविध वयोगटाच्या संघासाठी प्रशिक्षक नेमले. विशेष म्हणजे सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या रणजी ट्रॉफी मुंबई संघाच्या प्रशिक्षकाच्या निवडीचा निर्णय मात्र एमसीएने काही दिवसांकरीता पुढे ढकलला आहे. २ जूनला मुंबईच्या प्रमुख संघाच्या प्रशिक्षकाची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती एमसीए सुत्रांकडून मिळाली. या बैठकीला उपस्थित राहिलेल्या एमसीएच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमसीएने रणजी ट्रॉफीव्यतिरिक्त मुंबईच्या इतर सर्व वयोगटाच्या संघांच्या प्रशिक्षकपदासाठी निवड केली आहे. रणजी संघाच्या प्रशिक्षक पदाच्या निवडीची घोषणा २ जूनला करण्यात येईल. मुंबईच्या रणजी संघाच्या प्रशिक्षपदासाठी माजी कसोटीपटू प्रवीण आमरे आणि माजी यष्टीरक्षक समीर दिघे यांची नावे शर्यतीत आहेत. ‘मुंबईचा प्रशिक्षक या दोन व्यक्तींपैकीच एक असेल,’ अशी महत्त्वपुर्ण माहितीही सुत्रांनी दिली. मुंबई रणजी संघाचे विद्यमान प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांना रणजी ट्रॉफी संघाकडे कायम राखण्यात अपयश आले.दरम्यान, एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे एमसीएने आपल्या विविध वयोगटाच्या संघांच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची नावे जाहीर केली.निवड झालेले प्रशिक्षक :२३ वर्षांखालील : अमित पागनिस१९ वर्षांखालील : सतिश सामंत१६ वर्षांखालील : विनायक माने१४ वर्षांखालील : संदेश कावळेवरिष्ठ महिला : अपर्णा कांबळी १९ वर्षांखालील महिला : जयेश दादरकरविद्यापीठ पुरुष : विनय दांडेकरविद्यापीठ महिला : स्वाती पाटील