नागपूर : भारत आणि इंग्लंडच्या अंडर-१९ संघांदरम्यान दुसरा युवा कसोटी सामना शुक्रवारी अनिर्णीत संपला. उभय संघांदरम्यानची दोन कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत संपली. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या लढतीत इंग्लंडने डेलारे राउलिन्सच्या (१४०) शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ३७५ धावांची मजल मारली होती. प्रत्युत्तरात खेळताना भारताने ९ बाद ३८८ धावसंख्येवर डाव घोषित केला होता. सौरभ सिंगचे (१०९) शतक भारतीय डावाचे विशेष आकर्षण ठरले होते. इंग्लंडने सामन्याच्या चौथ्या व अखेरच्या दिवशी शुक्रवारी दुसऱ्या डावात २५५ धावा केल्या. त्यानंतर उभय कर्णधारांनी सामना अनिर्णीत संपल्याचे मान्य केले. इंग्लंडने कालच्या २ बाद ३४ धावसंख्येवरून आज पुढे खेळण्यास सुरुवात केली. इंग्लंड संघातर्फे जॉर्ज बार्टलेट (७६) व रालिन्स (४९) यांचे योगदान उल्लेखनीय ठरले. भारताने १० गोलंदाजांचा वापर केला. त्यात हर्ष त्यागी (४-६७) सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. याच स्थळावर उभय संघांदरम्यान खेळला गेलेला पहिला युवा कसोटी सामनाही अनिर्णीत संपला होता. भारताच्या अंडर-१९ संघाने पाच सामन्यांच्या युवा एकदिवसीय मालिकेत ३-१ ने बाजी मारली आहे. (क्रीडा प्रतिनिधी) धावफलकइंग्लंड (पहिला डाव) : सर्वबाद ३७५.भारत (पहिला डाव) : ९ बाद ३८८ (डाव घोषित) .च्इंग्लंड (दुसरा डाव-२ बाद ३४ वरून पुढे) : डॅनियल हॉटन निवृत्त ०, जॉर्ज बार्टलेट त्रि.गो. त्यागी ७६, डेलरे रॉलिन्स झे. आकरे गो. रॉय ४९, ओली पोप झे. आकरे गो. त्यागी ०, इआॅन वुड्स झे. आकरे, गो. त्यागी १६, विल जॅक्स झे.गोस्वामी गो. सिंग १९, आरोन बिअर्ड नाबाद ३४, लियाम व्हाईट धावबाद ८, हेन्री ब्रुक्स झे. लोकेश्वर गो. आकरे ०. अवांतर-२४, एकूण-८२ षटकांत ९ बाद २५५.च्गडी बाद होण्याचा क्रम : १-३०, २-३४, ३-१५५, ४-१६२, ५-१९३, ६-१९४, ७-२४४, ८-२५३, ९-२५५.च्गोलंदाजी : कनिश सेठ ११-२-२९-०, रिषभ भगत ५-०-१९-०, डॅरिल फेरारिओ ८-०-४१-१, हर्ष त्यागी २५-७-६७-४, अनुकूल रॉय २०-९-४२-१, जाँटी सिद्धू ३-१-८-०, सौरभ सिंग ५-०-९-१, उत्कर्ष सिंग ३-०-१५-०, अभिषेक गोस्वामी १-०-२-०, सिद्धार्थ आकरे १-०-१-१.
युवा संघातील दुसरी कसोटीही अनिर्णीत
By admin | Updated: February 25, 2017 01:24 IST