शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

स्कॉटलंडचा शेवट गोड

By admin | Updated: March 13, 2016 04:21 IST

टी-२० विश्वचषक पात्रता फेरीतील सामन्यात दोन वेळा पावसाने व्यत्यय आणत हाँगकाँगच्या विजयाच्या आशेवर पाणी पाडले. हाँगकाँगने २० षटकांत १२७ धावा केल्या

आकाश नेवे,  नागपूरटी-२० विश्वचषक पात्रता फेरीतील सामन्यात दोन वेळा पावसाने व्यत्यय आणत हाँगकाँगच्या विजयाच्या आशेवर पाणी पाडले. हाँगकाँगने २० षटकांत १२७ धावा केल्या. डकवर्थ लुईस नियमानुसार स्कॉटलंडला विजयासाठी दहा षटकांत ७६ धावांचे आव्हान देण्यात आले. हे आव्हान स्कॉटलंडने ८ गडी आणि दोन षटके राखून ७८ धावा करून सहज पूर्ण केले. हाँगकाँग विरोधात ७६ धावांचा पाठलाग करताना स्कॉटलंडची सुरुवात दमदार झाली. सलामीवीर जॉर्ज हुस्ने याने ११ चेंडूंतच चार चौकारांसह १९ धावा केल्या. नदीम अहमदने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. मॅट क्रॉसने १४ चेंडूत २२ धावा केल्या. त्याने १ उत्तुंग षटकार आणि दोन खणखणीत चौकार लगावले. त्याने ऐजाज खानच्या गोलंदाजीवर निजाकत खानकडे झेल दिला. त्याने कोएत्झरबरोबर ३६ धावांची भागीदारी केली. काएल कोएत्झरने नाबाद २० तर मॅट मॅकनने नाबाद १५ धावा केल्या. तत्पूर्वी हाँगकाँगने २० षटकांत १२७ धावा केल्या होत्या. हाँगकाँगचे सलामीवीर स्वस्तात माघारी परतल्यावर बाबर हयातने १५ धावा केल्या. चॅपमनने ४० धावा केल्या. त्याला अंशुमन राथने २१ धावा करत चांगली साथ दिली. या दोघांनी ४९ धावांची भागीदारी केली. चॅपमनने आपल्या खेळीत १ चौकार आणि १ षटकार ठोकला. मधल्या फळीतील फलंदाज निजाकत खानने १० चेंडूतच दोन उत्तुंग षटकार खेचत १७ धावा केल्या. निजाकतला मॅकनने बाद केले. मोठा फटका मारण्याच्या नादात तो आपली विकेट गमावून बसला. स्कॉटलंडकडून मॅट मॅकनने २६ धावांत दोन गडी बाद केले. तर मार्क वॅट, जोश डेव्ही, गॅव्हिन मेन, डी लांग यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.