सरोश, इकरा बॉईज, गुरु तेगबहादूर, नॅशनल हायस्कूल, मौलाना आझाद विजयी
By admin | Updated: August 25, 2014 22:33 IST
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे आयोजित के. डी. गादिया स्मृती आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत सरोश, इकरा बॉईज, गुरु तेगबहादूर, नॅशनल हायस्कूल, मौलाना आझाद हायस्कूल संघाने प्रतिस्पर्धी संघांवर मात केली.
सरोश, इकरा बॉईज, गुरु तेगबहादूर, नॅशनल हायस्कूल, मौलाना आझाद विजयी
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे आयोजित के. डी. गादिया स्मृती आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत सरोश, इकरा बॉईज, गुरु तेगबहादूर, नॅशनल हायस्कूल, मौलाना आझाद हायस्कूल संघाने प्रतिस्पर्धी संघांवर मात केली.१७ वर्षांखालील मुलांच्या गटात अमीनचे दोन गोल आणि फैजल, हुजैफ, राहुल यांनी प्रत्येकी केलेल्या एका गोलच्या बळावर सरोश स्कूलने शिशुविकास मंदिरवर ६-0 अशी मात केली. दुसर्या लढतीत इकरा बॉईज उर्दू स्कूल लिटल फ्लॉवरचा १-९ असा पराभव केला. तिसर्या लढतीत खीजर खानने केलेल्या गोलमुळे गुरु तेगबहादूर संघाने स्टँडर्ड संघावर १-0 अशी मात केली. नूर स्कूल आणि स्टेपिंग स्टोन यांच्यातील लढत 0-0 अशी बरोबरीत सुटली. पाचव्या लढतीत नॅशनल स्कूलने राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिक संघावर १-0 असा विजय मिळवला. विजयी गोल शेख सोहेलने केला. सहाव्या लढतीत मौलाना आझाद हायस्कूलने एमजीएमचा १-0 असा पराभव केला. निर्णायक गोल माजेद सिद्दीकीने केला. मंगळवारी मौलाना आझाद हायस्कूल आणि लिटल फ्लॉवर ब, स्टेपिंग स्टोन वि. मौलाना आझाद, शिशु विकास वि. स्टेपिंग स्टोन ब, अल्लामा शिबली वि. स्टेपिंग स्टोन अ, शिशुविकास वि. एस. एफ. एस. यांच्यात सामने होणार असल्याचे संयोजकांनी कळवले.