मुंबई : सारा जामसूतकर या मुंबई शहराच्या खेळाडूने आपल्या कामगिरीत कमालीचे सातत्य राखताना एका आठवड्यात दुसरे विजेतेपद पटकावले. साराने शुक्रवारी तिसऱ्या फोर स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलींमध्ये विजेतेपद पटकावले.
सारा वर्सेस आरोही यांच्यात झाली फायनल लढत
मुंबई शहर जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने दी वेलिंग्टन स्पोर्टस क्लबच्या यजमानपदाखाली झालेल्या या स्पर्धेत प्रभादेवी येथील कामगार क्रीडा मंडळाची खेळाडू असलेल्या साराने अंतिम सामन्यात शानदार खेळ केला. तिने आरोही चाफेकरचा ११-८, १३-११, ११-५ असा सरळ तीन गेममध्ये पराभव केला.
सारा जामसुतकर ठरली 'चॅम्पियन' महाराष्ट्र राज्य टेटे स्पर्धेत पटकावले जेतेपद
दुसऱ्या गेममध्ये आरोहीनं तगडी फाईट दिली, पण...
पहिला गेम सहज जिंकल्यानंतर साराला दुसऱ्या गेममध्ये आरोहीकडून कडव्या प्रतिकाराचा सामना करावा लागला. यानंतर तिसऱ्या गेममध्ये मात्र साराने आक्रमक खेळ करताना आरोहीला पुनरागमनाची एकही संधी न देता जेतेपदावर नाव कोरले. याआधी, साराने गेल्या आठवड्यात १८ जुलैला महाराष्ट्र राज्य रोख रकमेच्या टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलींमध्ये विजेतेपद पटकावले होते.