वुशू स्पर्धेत थोडम सनातोई देवी व नरेंद्र ग्रेवाल या भारतीय स्पर्धकांनी आपापल्या गटात उपांत्य फेरी गाठताना पदक निश्चित केले. नरेंद्र गे्रवालने पुरुषांच्या सॅन्डा ६० किलो वजन गटात पाकिस्तानच्या अब्दुल्लाचा २-०ने पराभव करीत उपांत्य फेरीत धडक मारली. सनातोईने उपांत्यपूर्व फेरीत चमकदार कामगिरी करताना मंगोलियाच्या अमगलंगरागलचा २-०ने पराभव केला. सनातोईला आता चीनच्या च्यांग लुआनच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. सनातोई आशियाई स्पर्धेत वुशूमध्ये पदक पटकाविणारी भारताची तिसरी खेळाडू ठरणार आहे. डब्ल्यू. संध्याराणीने २०१०मध्ये महिलांच्या सॅन्डा ६० किलो वजनगटात रौप्यपदकाचा मान मिळविला होता, तर बिमोलजित सिंगने सॅन्डा ६० किलो वजनगटात २००६ व २०१०मध्ये कांस्यपदक पटकाविले होते. पुरुष विभागात सजन लामा याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.
सनतोई, नरेंद्र ग्रेवालचे पदक निश्चित
By admin | Updated: September 23, 2014 06:02 IST