शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

संजूचा शतकी तडाखा; पुणे पराभूत

By admin | Updated: April 12, 2017 03:34 IST

संजू सॅमसनने ६३ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांच्या साह्याने ठोकलेल्या १०२ धावा आणि नंतर झहीर खान व अमित मिश्रा यांचे तीन आणि पॅट कमिन्सने घेतलेल्या २ विकेटच्या जोरावर

पुणे : संजू सॅमसनने ६३ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांच्या साह्याने ठोकलेल्या १०२ धावा आणि नंतर झहीर खान व अमित मिश्रा यांचे तीन आणि पॅट कमिन्सने घेतलेल्या २ विकेटच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने आयपीएल स्पर्धेत पुणे सुपर जायंट संघाचा ९७ धावांनी पराभव केला. पुणे संघाचा सलग दुसरा पराभव होता. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या लढतीत नाणेफेक जिंकून पुणे संघाने दिल्लीला प्रथम फलंदाजी दिली. दिल्ली संघाने विजयासाठी दिलेल्या २०६ धावांच्या आव्हानाला उत्तर देताना पुणे संघाची दिल्ली संघाच्या गोलंदाजांनी दाणादाण उडविली. पुणे सघांचा एकही फलंदाज २० पेक्षा जास्त धावा करू शकला नाही. त्यांचे चार फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले. मयांक अगरवाल, रजत भाटिया व दीपक चहर हे जर सोडले तर पुणे संघाचा एकही फलंदाज खेळपट्टीवर स्थिर होऊ शकला नाही. त्यांचा डाव १६.१ षटकात १०८ धावांत संपुष्टात आला. तत्पूर्वी, दिल्ली संघाने २० षटकांत ४ बाद २०५ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यांच्या सॅम बिलिंगने २४, संजू सॅमसनने आपल्या टी-२० कारकिर्दीतील पहिले शतक (१०२) ठोकले, ॠषभ पंतने ३१ आणि ख्रिस मॉरिसने नाबाद ३८ धावा केल्या. (क्रीडा प्रतिनिधी)संक्षिप्त धावफलकदिल्ली डेअरडेव्हिल्स : आदित्य तरे झे. धोनी गो. चहर ०, सॅम बिलिंग्ज त्रि. गो. इम्रान ताहिर २४, संजू सॅमसन त्रि. गो. झम्पा १०२, ऋषभ पंत धावबाद ३१, कोरी अँडरसन नाबाद २, ख्रिस मॉरिस नाबाद ३८; अवांतर : ८; एकूण : २० षटकांत ४ बाद २०५; गोलंदाजी : दीपक चहर १/३५, इम्रान ताहिर १/८.रायझिंग पुणे सुपरजायंट : अजिंक्य राहाणे १०, मयांक अगरवाल २०, राहुल त्रिपाठी १०, महेंद्रसिंह धोनी ११, रजत भाटिया १६, दीपक चहर १४; अवांतर : ५; एकूण : १६.१ षटकांत सर्वबाद १०८; गोलंदाजी : पॅट कमिन्स २/२४, झहीर खान ३/२०, अमित मिश्रा ३/११, शाहबाझ नदिम १/२३, ख्रिस मॉरिस १/१९.