शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

संजीवनीने जिंकले कांस्य, भारतीय महिला संघानेही पटकावले कांस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:37 IST

महाराष्ट्राची सुकन्या आणि भारताची लांब पल्ल्याची धावपटू संजीवनी जाधव हिने चीन येथे सुरु असलेल्या १४व्या आशियाई क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धेच्या ८ किमी शर्यतीमध्ये कांस्य पदकाची कमाई करत अभिमानाने तिरंगा फडकविला.

गुइयांग : महाराष्ट्राची सुकन्या आणि भारताची लांब पल्ल्याची धावपटू संजीवनी जाधव हिने चीन येथे सुरु असलेल्या १४व्या आशियाई क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धेच्या ८ किमी शर्यतीमध्ये कांस्य पदकाची कमाई करत अभिमानाने तिरंगा फडकविला. विशेष म्हणजे याच शर्यतीच्या सांघिक गटातही भारतीय संघाने कांस्य पदकाची कमाई करत आपली छाप पाडली.२० वर्षीय संजीवनीने २८ मिनिट १९ सेकंदाची वेळ देत शर्यत पूर्ण केली आणि कांस्य पदकावर नाव कोरले. चीनच्या ली डॅन हिने २८ मिनिट ३ सेकंदाची वेळ देत सुवर्ण पदकावर कब्जा केला. तसेच, जपानच्या अ‍ॅबी युकारी हिने २८ मिनिट ६ सेकंदासह रौप्य पदक पटकावले.याच शर्यतीमध्ये सांघिक गटात भारतीय संघाला कांस्य पदक जिंकण्यात यश आले. चार धावपटूंचा समावेश असलेल्या भारतीय संघामध्ये संजीवनीसह स्वाती गाढवे, जुम्मा खातून आणि ललिता बाबर यांचा सहभाग होता. प्रत्येक संघातील तीन धावटूंची वैयक्तिक शर्यतीतील सर्वोत्तम वेळ लक्षात घेऊन सांघिक पदक निश्चित करण्यात आले. यानुसार भारताने कांस्य पटकावले.स्वातीने ३८ मिनिट १८ सेकंदाची वेळ देत ११वे स्थान पटकावले. तसेच, खातूनला ३२ मिनिट १४ सेकंदाच्या वेळेसह १४व्या स्थानी समाधान मानावे लागले. त्याचवेळी, भारताची स्टार धावपटू आणि रिओ आॅलिम्पिकमध्ये ३ हजार मीटर स्टीपलचेजच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या ललिता बाबरला मात्र आपल्या लौकिकानुसार कामगिरी करता आली नाही.ललिताने ३२ मिनिट ५३ सेकंदाची वेळ नोंदवली आणि यासह ती १५ धावपटूंचा सहभाग असलेल्या या शर्यतीत तळाच्या स्थानी राहिली. मात्र, संजीवनी जाधवच्या अप्रतिम कामगिरीमुळे भारतीय संघाला पोडियम स्थान पटकावण्यात यश आले. (वृत्तसंस्था)>पुरुषांचे पदक थोडक्यात हुकलेपुरुषांच्या १२ किमी क्रॉस कंट्री शर्यतीमध्ये भारतीय संघाचे पदक थोडक्यात हुकले. या शर्यतीमध्ये भारताला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले.जपानने एकहाती वर्चस्व राखत सुवर्ण पटकावले असून चीन व इराण यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदकावर नाव कोरले.भारतीय संघामध्ये शंकर क्षेत्री (९वा), प्रदीप चौधरी (११वा), अर्जुन कुमार (१४वा) आणि रती सैनी (१५वा) यांचा समावेश होता. पुरुषांच्या शर्यतीमध्ये एकूण २४ धावपटूंचा सहभाग होता.>पुनरागमन अपयशी... लग्नानंतर तब्बल एक वर्षाच्या कालावधीनंतर पुनरागमन केलेल्या ललिता बाबरला अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले. आशियाई स्पर्धा माझे मुख्य लक्ष्य असून यासाठी राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी न होण्याचा माझा विचार असल्याचे मत काही दिवसांपूर्वी ललिताने व्यक्त केले होते. मात्र, आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील अपयशी कामगिरीनंतर आता तिला आणखी मेहनत घ्यावी लागेल.