संजय राठोडची विभागीय स्पर्धेसाठी निवड
By admin | Updated: September 12, 2014 22:51 IST
बोरामणी: एस़व्ही़सी़एस़ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील 11 वी इयत्तेत शिकणार्या संजय राठोडची विभागीय सायकलिंग स्पर्धेसाठी निवड झाली़ डोणगाव रोड येथे झालेल्या शालेय 19 वर्षे वयोगटातील सायकलिंग स्पर्धेत त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आह़े या स्पर्धेत विविध वयोगटातून एकूण 150 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता़
संजय राठोडची विभागीय स्पर्धेसाठी निवड
बोरामणी: एस़व्ही़सी़एस़ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील 11 वी इयत्तेत शिकणार्या संजय राठोडची विभागीय सायकलिंग स्पर्धेसाठी निवड झाली़ डोणगाव रोड येथे झालेल्या शालेय 19 वर्षे वयोगटातील सायकलिंग स्पर्धेत त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आह़े या स्पर्धेत विविध वयोगटातून एकूण 150 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता़त्याला क्रीडाशिक्षक हणमंत येळमेली यांचे मार्गदर्शन लाभल़े त्यांचे प्राचार्य महांतेश कौलगी, पर्यवेक्षक सिद्रामप्पा उपासे, आकळवाडी यांनी कौतुक केल़े