न्यू हेवन : भारताची आघाडीची टेनिस तारका सानिया मिर्झा हिने सोमवारी सुरू होणाऱ्या वर्षाच्या अखेरच्या व चौथ्या ग्रँडस्लॅम यूएस ओपनआधी येथे रोमानियाच्या मोनिका निकुलेस्कू हिच्या साथीने कनेक्टीकट ओपनमध्ये दुहेरीचे विजेतेपद पटकावले. या विजयाने तिचा यूएस ओपनसाठी आत्मविश्वास उंचाविण्यास मदत मिळणार आहे.सानिया आणि निकुलेस्कूयांनी नुकतीच पुन्हा जोडी बनवली आणि पहिले विजेतेपद आपल्या नावावर केले. तिने गेल्या वेळेस २0१0 मध्ये जोडी बनवली होती. सानिया आणि निकुलेस्कूने विजेतेपदाच्या लढतीत युक्रेनच्या कॅटरिना बोंडारेंको आणि तैवानच्या चुआंग चिया जंग जोडीचा एक तास ३0 मिनिटांच्या संघर्षपूर्ण लढतीत ७-५, ६-४ असा पराभव केला. सानिया आणि निकुलेस्कू ही जोडी फक्त थोड्या कालावधीसाठी असून, या दोन्ही खेळाडूंनी यूएस ओपनमध्ये नियमित जोडीदारासोबत खेळणार असल्याचे स्पष्ट केले.
सानियाने जिंकले कनेक्टीकट ओपनचे विजेतेपद
By admin | Updated: August 29, 2016 01:41 IST