शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
5
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
6
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
7
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
8
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
9
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
10
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
11
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
12
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
13
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
14
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
15
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
16
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
17
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
18
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
19
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
20
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक

सानिया नंबर वन; बोपण्णाही टॉप टेनमध्ये

By admin | Updated: July 14, 2015 02:47 IST

भारतीय टेनिसतारका सानिया मिर्झा हिने विम्बल्डनमध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकून डब्ल्यूटीए दुहेरीच्या रँकिंगमध्ये आपले नंबर वनचे स्थान अधिक

नवी दिल्ली : भारतीय टेनिसतारका सानिया मिर्झा हिने विम्बल्डनमध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकून डब्ल्यूटीए दुहेरीच्या रँकिंगमध्ये आपले नंबर वनचे स्थान अधिक मजबूत केले आहे, तर रोहन बोपन्ना एटीपी दुहेरीच्या रँकिंगमध्ये जवळपास २० महिन्यांनंतर पुन्हा टॉप टेनमध्ये स्थान मिळविण्यात यशस्वी ठरला.सोमदेव देववर्मन अमेरिकेत निल्सन प्रो टेनिस चॅम्पियनशिप जिंकल्यामुळे एटीपी एकेरीच्या रँकिंगमध्ये पुन्हा १५० खेळाडूंत पोहोचला आहे. त्याचबरोबर तो भारताचा एकेरीतील नंबर वन खेळाडूदेखील बनला आहे. सानियाने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीसच्या साथीने विम्बल्डन महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकून नवीन इतिहास घडवला. ही हैदराबादी खेळाडू याआधीच अव्वल स्थानावर होती; परंतु आता तिचे ९,५१० डब्ल्यूटीए गुण झाले आहेत. हिंगीस ८,८६५ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. सानिया आणि हिंगीस जोडी रोड टु सिंगापूरच्या शर्यतीत आधीच अव्वल स्थानी होती; परंतु त्यांनी आता ५,८८६ गुणांसह आपली स्थिती आणखी बळकट केली आहे. एटीपी दुहेरी रँकिंगमध्ये बोपन्नाने आठ क्रमांकांनी झेप घेतली असून, तो दहाव्या स्थानी पोहोचला आहे. बोपन्ना याआधी २८ आॅक्टोबर २०१३मध्ये अव्वल दहांमध्ये पोहोचला होता.पेसने हिंगीसच्या साथीने मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले असले, तरी तो पुरुष दुहेरीत कॅनडाचा त्याचा जोडीदार डॅनियल नेस्टरच्या साथीने अंतिम १६च्या पुढे जाऊ शकला नव्हता. त्यामुळे हा स्टार भारतीय खेळाडू ८ स्थानांनी घसरून ३२व्या क्रमांकावर पोहोचला आहे. पेस आणि नेस्टर जोडी एटीपी रेस टू लंडनमध्ये २७व्या, तर बोपन्ना आणि मार्जिया सहाव्या स्थानावर पोहोचले आहेत.भांबरीने ५ स्थानांनी झेप घेतली असून, तो १५१व्या, साकेत मयनेनी १९८व्या, विम्बल्डनमध्ये मुलांच्या गटात दुहेरीत विजेतेपद पटकावणारा सुमीत नागल एकेरीत ७४५व्या स्थानी पोहोचला आहे.(वृत्तसंस्था)