शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

स्थगिती बाजूला ठेवत सानियाला ‘खेलरत्न’

By admin | Updated: August 30, 2015 02:29 IST

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शनिवारी सायंकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते यंदाचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या स्टार महिला टेनिस

क्रीडा मंत्रालय ठाम : कोर्टात निवडीचे समर्थन करणार

नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शनिवारी सायंकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते यंदाचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या स्टार महिला टेनिस खेळाडू सानिया मिर्झाला राजीव गांधी ‘खेलरत्न’ हा सर्वोच्च राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दखल घेण्याची बाब म्हणजे कर्नाटक उच्च न्यायालयाने या सर्वोच्च पुरस्कारासाठी स्थगितीचा निर्णय दिल्यानंतरही सानियाला पुरस्कार देण्यात आला. त्याचवेळी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने यावेळी सानियाच्या पुरस्काराचे समर्थन करताना आगामी १५ दिवसांत आपली भूमिका मांडण्याचा निर्णय घेतल्याचे कळाले.रौप्यपदक विजेता पॅरॉलिम्पियन अ‍ॅथलिट एच. एन. गिरीशने यंदाच्या ‘खेलरत्न’ विरोधात कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये याचिका देत आपण या पुरस्कारासाठी पात्र असल्याचे सांगितले. उच्च न्यायालयाने पुरस्कार सोहळ्याच्या एक दिवस आधी स्थगितीचा निर्णय देत गिरीशला दिलासा, तर क्रीडा मंत्रालयाला धक्का दिला होता. मात्र यानंतरही क्रीडा मंत्रालयाने पुरस्कारांमध्ये बदल न करण्याचा निर्णय घेत सानियाला ‘खेलरत्न’ने गौरवले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार क्रीडा मंत्रालयाकडे आपली बाजू मांडण्यास अजूनही १५ दिवसांची मुदत असून, या कालावधीत क्रीडा मंत्रालय सर्व पुराव्यांनिशी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला उत्तर देणार असल्याची माहिती मिळाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)