शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

सानिया-हिंगीसला विजेतेपद

By admin | Updated: September 27, 2015 00:12 IST

विम्बल्डन आणि यूएस चॅम्पियन जोडी भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करताना शनिवारी येथे ग्वांग्झू ओपन

ग्वांग्झू : विम्बल्डन आणि यूएस चॅम्पियन जोडी भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करताना शनिवारी येथे ग्वांग्झू ओपन टेनिस स्पर्धेतील महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले.अव्वल मानांकित सानिया-हिंगीस जोडीने यजमान चीनच्या शिलिन शू आणि शियोदी यू या बिगरमानांकित जोडीचा ६-३, ६-१ अशा सलग सेट्समध्ये पराभव करताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. ग्वांग्झू इंटरनॅशनल सेंटरमध्ये झालेल्या एकतर्फी लढतीत भारतीय-स्वीस जोडीने अवघ्या ५८ मिनिटांत अंतिम सामना जिंकला.या वर्षी सलग दोन ग्रँडस्लॅमचे विजेतेपद पटकावणाऱ्या जागतिक क्रमवारीतील महिला दुहेरीतील अव्वल खेळाडू सानिया आणि हिंगीस यांनी सर्व्हिसवर ७० टक्के आणि दुसऱ्या सर्व्हिसवर ६४ टक्के गुण घेतले. तसेच, शानदार कामगिरी करताना ६ पैकी ५ ब्रेक पॉइंट वाचवले. प्रतिस्पर्धी चीनच्या जोडीने सामन्यात एकदा दुहेरी चूक केली आणि सातपैकी दोनदाच ते ब्रेक गुण वाचवू शकले. त्याआधी भारतीय-स्वीस जोडीला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता, तर उपांत्य फेरीत त्यांनी इस्राईलच्या ज्युलिया ग्लुशेंको व स्वीडनच्या रेबेका पीटरसन या जोडीला नमवले होते. (वृत्तसंस्था)