शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
3
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
4
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
5
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
6
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
7
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
8
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
9
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
10
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
11
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
12
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
13
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
14
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
15
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
16
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
17
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
18
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
19
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
20
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!

कोहलीच्या फॉर्मची सॅमीला भीती

By admin | Updated: October 3, 2014 01:20 IST

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी याच्याशी सवांद साधताना नेहमी आनंद मिळतो. स्थिती काही असो त्याच्या चेह:यावरील स्मित कमी होत नाही.

विनय नायडू = मुंबई
वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी याच्याशी सवांद साधताना नेहमी आनंद मिळतो. स्थिती काही असो त्याच्या चेह:यावरील स्मित कमी होत नाही. गुरुवारी मुंबईच्या क्रिकेट क्लब ऑफ इंडियात (सीसीआय) त्याची पुन्हा भेट झाली.  शुक्रवारी भारत ‘अ’ संघाविरुद्ध कसून सराव केल्यानंतर त्याच्या चेह:यावर तसूभरही मरगळ दिसत नव्हती.  माझे आयुष्य आणि क्रिकेट एंजॉय करत आहे. कसोटी संघ पुढे जात आहे आणि त्यात माझी गरजही तितकीशी राहिलेली नाही. तरीही एक दिवसीय आणि टी-2क् संघात देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा आनंद लुटत असल्याचे, तो म्हणाला. 
भारताचा स्टार विराट कोहली सध्या खराब फॉर्मात आहे. त्याच्या मागील काही सामन्यांचा अभ्यास करून तुम्ही काही रणनिती आखली आहे का?, असा प्रश्न विचारल्यास तो मिश्कीलपणो म्हणाला, मी आशा करतो की विराटला आमच्या विरुद्ध फॉर्म सापडायला नको. विराट हा सर्वोत्तम फलंदाज आहे आणि तो कसून सराव करत असल्याचा मला विश्वास आहे. त्यामुळे मी आशा करतो की आमच्याविरुद्ध त्याची बॅट तळपायला नको. सुनील नरिन हा चॅम्पियन आणि खतरनाक गोलंदाज आहे. तो आमच्यासाठी हुकमी एक्का आहे. तो कमबॅक करेल याची खात्री असल्याचे सॅमी म्हणाला. आमच्याकडे केमार रोच आणि जेरम टेलर यांच्यासारखे अनुभवी गोलंदाज असल्याने सुनीलला ते चांगली मदत करतील असा विश्वासही त्याने व्यक्त केला. त्यामुळे गतवर्षी आमच्या हातातून मालिका निसटली होती. आशा करतो की यंदा आम्ही भारताला त्यांच्याच धर्तीवर 27 वर्षानंतर हरवण्यास यशस्वी होऊ.
 
ही मालिका अटीतटीची होणार - पोलार्ड
मुंबई : जगातील अव्वल वन डे संघ असलेल्या भारताविरुद्ध विजय मिळवणो सोपे नसले तरी आमचा संघ यजमानांना कडवी टक्कर देण्यास सज्ज असल्याचा दावा वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज किरोन पोलार्ड याने गुरुवारी मुंबईत केला. विजयासाठी दोन्ही संघांमध्ये चुरस रंगणार असल्याने ही मालिका अटीतटीची होईल, यात शंका नाही असा विश्वासही त्याने व्यक्त केला. इंडियन प्रीमिअर लीग, चॅम्पियन्स लीग आणि इतर स्पर्धाच्या माध्यमातून आमच्या बहुतांश खेळांडूंना येथील खेळपट्टींचा अंदाज असल्याने भारतासाठी ही मालिका सोपी जाणार नाही.