शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

औरंगाबादच्या संभाजीचा डबल गोल्डन धमाका

By admin | Updated: September 19, 2016 04:05 IST

-पाटील याने इतिहास रचताना येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ ज्युनियर विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी डबल गोल्डन धमाका केला.

गबाला : औरंगाबादचा उदयोन्मुख १७ वर्षीय नेमबाज संभाजी शिवाजी झनझन-पाटील याने इतिहास रचताना येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ ज्युनियर विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी डबल गोल्डन धमाका केला. त्याच्या या शानदार कामगिरीने भारतानेदेखील पहिल्याच दिवशी सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक साधली.अजरबेजानच्या गबाला येथे सुरू असलेल्या या विश्वचषक स्पर्धेत औरंगाबादच्या संभाजी पाटील याने ज्युनियर पुरुषांच्या २५ मीटर स्टँडर्ड पिस्टल स्पर्धेत ५६२ गुणांसह आॅस्ट्रेलियाच्या सरगेई इवग्लेस्की आणि जेम्स एशमोर यांना मागे टाकत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. सरगेईने रौप्य आणि जेम्स एश्मोर याने कांस्यपदक जिंकले. त्यानंतर संभाजी पाटील याने आपल्या या देदीप्यमान कामगिरीत सातत्य राखताना भारताला सांघिक सुवर्णपदक जिंकून देताना भारताला गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचवण्यात निर्णायक भूमिका बजावली. संभाजीने सांघिक सुवर्ण गुरमीत आणि रितुराजसिंह यांच्यासाथीने देशाला जिंकून दिले. त्याआधी बंगालच्या शुभंकर प्रामाणिक याने भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. त्याने हे सोनेरी यश ५0 मीटर रायफल प्रो प्रकारात २0 शॉटसह एकूण २0५.५ गुणांसह मिळवले. झेक प्रजासत्ताकच्या फिलीप नेपेजचलने २0५.२ गुणांसह रौप्य आणि रोमानियाच्या ड्रेगोमिर ईरोदाके याने १८१.१ गुणांसह कांस्यपदक आपल्या नावावर केले. शुभंकरने सांघिक गटात फत्तेसिंह ढिल्लो व अजय नितीश याच्या साथीने भारताला सांघिक रौप्यपदकदेखील जिंकून दिले. याशिवाय भारतीय नेमबाजांनी ज्युनियर पुरुष संघ रायफल प्रोमध्ये रौप्य आणि दोन कांस्यपदकाची देखील कमाई केली. गतवर्षी जर्मनीत झालेल्या पहिल्या ज्युनियर वर्ल्डकपमध्ये भारतीय नेमबाजांनी तीन सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कांस्यपदकांसह गुणतालिकेत चौथे स्थान मिळवले होते.>‘संभाजीसाठी नेमबाजी जीव की प्राण’अवघ्या १७ व्या वर्षी प्रतिष्ठित अशा विश्वचषक नेमबाजीसारख्या स्पर्धेसाठी भारताला दोन सुवर्णपदक जिंकून देण्याची संभाजीची कामगिरी ही वडील म्हणून माझ्यासाठी खूपच अभिमानाची बाब आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीत संभाजीने ५५ पदके जिंकली आहेत. नेमबाजी हा त्याच्यासाठी जीव की प्राण आहे. नातेवाइकांच्या कार्यक्रमासाठीदेखील तो कधीही जात नाही. नेमबाजी हा त्याच्यासाठी श्वास बनला आहे, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया संभाजी पाटीलचे वडील शिवाजी झनझन-पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. शिवाजी झनझन-पाटील हे मनपात मुख्य अग्निशमन अधिकारी आहेत.