शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

साक्षी, बजरंग यांच्यावर भारताची मदार, जागतिक कुस्ती : विनेश फोगाटकडूनही पदकाची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:34 IST

सोमवारपासून सुरू होत असलेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आॅलिम्पिक पदकविजेती साक्षी मलिक आणि आशियाईविजेता बजरंग पुनिया भारतीय संघाच्या मोहिमेचे नेतृत्व करतील. रिओ आॅलिम्पिकमध्ये ५८ किलो वजनी गटात कांस्य जिंकणाºया साक्षीवर भारताची प्रामुख्याने मदार असेल. दरम्यान, साक्षीने आपला वजनी गट वाढवला असून तिने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या ६० किलो वजनी गटात रौप्य जिंकले होते.

पॅरिस : सोमवारपासून सुरू होत असलेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आॅलिम्पिक पदकविजेती साक्षी मलिक आणि आशियाईविजेता बजरंग पुनिया भारतीय संघाच्या मोहिमेचे नेतृत्व करतील. रिओ आॅलिम्पिकमध्ये ५८ किलो वजनी गटात कांस्य जिंकणाºया साक्षीवर भारताची प्रामुख्याने मदार असेल. दरम्यान, साक्षीने आपला वजनी गट वाढवला असून तिने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या ६० किलो वजनी गटात रौप्य जिंकले होते.त्याचप्रमाणे, आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील अन्य रौप्यविजेती विनेश फोगाट ४८ किलो वजनी गटामध्ये आव्हान उभे करेल. रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत झालेल्या दुखापतीनंतर विनेशने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत ५५ किलो वजनी गटात खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जागतिक स्पर्धेत ती ४८ किलो वजनी गटातून खेळेल. त्याचवेळी गीता आणि बबिता यांनी निवड प्रक्रियेमध्ये सहभाग न घेतल्याने, तर रितू आणि संगीता पात्रता फेरीतच अपयशी ठरल्याने या स्पर्धेत खेळणार नाहीत.पुरुषांमध्ये फ्रीस्टाइल गटात बजरंग भारताकडून सुवर्णपदकाचा दावेदार असेल. त्याने २०१३ बुडापेस्ट जागतिक स्पर्धेत कांस्य पटकावले होते. आशियाई स्पर्धेतही त्याने सुवर्णपदकावर कब्जा केला होता. या स्पर्धेत बजरंग ६५ किलो वजनी गटातून सहभागी होईल. बजरंगव्यतिरिक्त संदीप तोमरवर (५७ किलो) भारताची मदार असेल. तसेच अमित धनगड (७०), प्रवीण राणा (७४) आणि सत्यवान कादियान (९७) यांच्याकडूनही भारताला अपेक्षा आहेत. (वृत्तसंस्था)भारतीय संघपुरुष फ्रीस्टाइल :संदीप तोमर (५७ किग्रा), हरफूल (६१), बजरंग पुनिया (६५), अमित धनगड (७०), प्रवीण राणा (७४), दीपक (८६), सत्यव्रत कादियान (९७) आणि सुमित (१२५).महिला कुस्ती :विनेश फोगाट (४८), शीतल (५३), ललिता (५५), पूजा ढांडा (५८), साक्षी मलिक (६०), शिल्पी (६३), नवज्योत कौर (६९) आणि पूजा (७५).ग्रीकोरोमनज्ञानेंदर (५९),रविंदर (६६), योगेश (७१), गुरप्रीत सिंह (७५),हरप्रीत सिंह (८०),रविंदर खत्री (८५),हरदीप (९८) आणिनवीन (१३०).