शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पद्मभूषण पुरस्कारासाठी सायनाची शिफारस, पण संभ्रम कायम

By admin | Updated: January 5, 2015 16:18 IST

क्रीडा मंत्रालयाने पद्मभूषण पुरस्कारासाठी बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या नावाची शिफारस केली असली तरी शिफारस करण्याची अंतिम तारिख लोटून सुमारे चार महिने झाले आहेत.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. ५ - क्रीडा मंत्रालयाने सोमवारी पद्मभूषण पुरस्कारासाठी बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या नावाची शिफारस केली आहे. मात्र शिफारस करण्याची अंतिम तारिख लोटून सुमारे चार महिने झाले असून सायनाला यंदा पद्मभूषण पुरस्कार मिळणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे. 
पद्मभूषण पुरस्कार न मिळाल्याने सायना नेहवालने दोन दिवसांपूर्वी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. आपणही पद्मभूषण पुरस्कारासाठी पात्र आहोत. पद्मश्री पुरस्कारानंतर पद्मभूषणसाठी पाच वर्षांची जी अट आहे ती मी देखील पूर्ण करते. सुशील कुमार ही अट पूर्ण करीत असेल आणि पुरस्कारसाठी पात्र भरत असेल, तर मी का नाही, असा सवाल करीत तिने केंद्रीय क्रीडा मंत्रालयावर नाराजी व्यक्त केली होती. सायनाने उघडपणे व्यथा मांडल्यावर  क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी याप्रकरणाची दखल घेतली होती. सोमवारी क्रीडा मंत्रालयाने गृह मंत्रालयाकडे सायनाच्या नावाची शिफारस केली आहे. शनिवारी आम्हाला भारतीय बॅडमिंटन महासंघाकडून सायनाच्या नावाची शिफारस आली असून सायनाचे क्रीडा क्षेत्रातील योगदान पाहता तिची शिफारस गृहमंत्रालयकडे पाठवली आहे असे क्रीडा मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आले. 
 
शिफारस झाली पण तिढा कायम 
गृहमंत्रालयाने गेल्या वर्षी १ मे रोजी परिपत्रक काढून पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारशी मागवल्या होत्या. पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस करण्याची अंतिम तारिख १५ सप्टेंबर २०१४ होती. हे परिपत्रक आम्ही सर्व क्रीडा महासंघांना पाठवले होते आणि २० ऑगस्टपर्यंत महासंघांनी त्यांच्या खेळाडूंची व प्रशिक्षकांची नावे आम्हाला पाठवावीत अशी सूचनाही केली होती असा दावा क्रीडा मंत्रालयाने केला आहे. मात्र बॅडमिंटन महासंघाने दिलेल्या मुदतीमध्ये सायनाचे नाव पाठवलेच नाही असे क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे. आता ही मुदत उलटून चार महिन्यांचा कालावधी लोटल्याने गृह मंत्रालय ही शिफारस स्वीकारेल का याबाबत शंका उपस्थित होत आहे.