शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई चषक बॅडमिंटन : सायना, श्रीकांत, सिंधू दुसऱ्या फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:24 IST

दुसरीकडे रियो आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाºया पी. व्हि. सिंधूने आपल्या नावाला साजेसा खेळ करीत चीनी तैपईच्या पाइ यू पोला २१-१४, २१-१९ गुणांनी नमवित दुसºया फेरीतील आपली जागा निश्चित केली.

वुहान : भारताच्या आघाडीचे बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, के. श्रीकांत आणि पी. व्ही. सिंधू यांनी आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत आपआपल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून दुसºया फेरीत प्रवेश केला.राष्टÑकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या सायना नेहवालने महिलांच्या एकेरीत सिंगापूरच्या यिओ जिया मिनचा सरळ दोन सेटमध्ये २१-१२, २१-९ गुणांनी पराभव करून दुसºया फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे रियो आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाºया पी. व्हि. सिंधूने आपल्या नावाला साजेसा खेळ करीत चीनी तैपईच्या पाइ यू पोला २१-१४, २१-१९ गुणांनी नमवित दुसºया फेरीतील आपली जागा निश्चित केली. पुरूषांच्या एकेरीत अग्रमानांकित आणि राष्टÑकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाºया भारताच्या के. श्रीकांला जापानच्या केंता निशिमोतोविरूद्द खेळताना घाम गाळावा लागला. या दोघांची ळैत तीन गेममध्ये गेली.श्रीकांतने निशिमोतोविरूध्द पहिली गेम १३-२१ गुणांनी गमाविली. नंतर श्रीकांतने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून निशिमोतोला कोणतीही संधी न देता दुसरी व तिसरी गेम अनुक्रमे २१-१६, २१-१६ गुणांनी जिंकून दुसºया फेरीत प्रवेश केला. भारताच्या समीर वर्माला मात्र पुरूष एकेरीत पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. समीरला चीनी तैपईच्या चाउ टिएने २१-२३, १७-२१ गुणांनी नमविले. (वृत्तसंस्था)अर्जुन, श्लोक दुहेरीच्या पुढच्या फेरीतभारताचा अर्जुन एमआर आणि रामचंद्रन श्लोक यांनी पुरुष दुहेरीत तर मघना जक्कमपुदी आणि पूर्विशा एसराम यांनी महिला दुहेरीत आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून पुढच्या फेरीत प्रवेश केला. अर्जुन-श्लोक जोडीने कोरियाच्या चुंग सियोक व किम डुकयोंग जोडीला २५-२३, २३-२१ असे नमविले. दुसरीकडे मेघना आणि पूर्विशाने ओेंग रे नी व वोंग जिया यिग क्रिस्टल या सिंगापूरच्या जोडीला १४-२१, २२-१०, २१-१७ असे नमविले.

टॅग्स :BadmintonBadminton