शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

सायनाला उपविजेतेपद

By admin | Updated: November 16, 2015 02:49 IST

संपूर्ण स्पर्धेत धडाकेबाज खेळ करून गतविजेत्याला साजेशी कामगिरी करणाऱ्या भारताच्या फुलराणी सायना नेहवालला चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

फुझोऊ (चीन) : संपूर्ण स्पर्धेत धडाकेबाज खेळ करून गतविजेत्याला साजेशी कामगिरी करणाऱ्या भारताच्या फुलराणी सायना नेहवालला चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अत्यंत एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात सायना पुन्हा एकदा चिनी ड्रॅगनच्या विळख्यात सापडली. कट्टर प्रतिस्पर्धी मानली जाणारी ली जुईरुई विरुद्ध सायनाचा केवळ ३९ मिनिटांमध्ये पराभव झाला.चायना ओपनची गतविजेती असलेली सायना स्पर्धेत अग्रमानांकित होती. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच तिने शानदार खेळ करताना विजेतेपद राखण्याच्या दृष्टीने आगेकूच केली होती. मात्र, यंदाच्या वर्षात पाचवा अंतिम सामना खेळत असलेली सायना तिसऱ्यांदा अपयशी ठरली. पूर्णपणे एकतर्फी झालेल्या या अंतिम सामन्यात जुईरुई विरुद्ध सायना १२-२१, १५-२१ अशी सपशेल अपयशी ठरली. विशेष म्हणजे याआधी उपांत्य सामन्यात सायनाने चीनच्या सातव्या मानांकित वांग यिहानचा फडशा पाडून दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, तिला हाच धडाका जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू जुईरुईविरुद्ध कायम राखण्यात अपयश आले.पहिल्या सेटमध्ये सायनाने शानदार सुरुवात करताना ४-१ अशी आघाडी घेतली होती. मात्र जुईरुईने ७-४ अशी मुसंडी मारल्यानंतर सलग गुणांचा धडाका लावला. पहिला सेट २१-१२ असा सहज जिंकताना तिने आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या सेटमध्ये सायनाने दमदार सुरुवात करताना ४-० अशी आघाडी घेतली होती. परंतु पुन्हा एकदा खेळावरील नियंत्रण गमावल्याने जुईरुईने ४-५ अशी पिछाडी कमी करून सायनाला गाठले. यानंतर सायनाने जबरदस्त फटके मारताना सलग ४ गुण घेत ९-४ अशी आघाडी घेतली. १२-६ अशा मजबूत स्थितीत असताना सायनाकडून बरोबरीची अपेक्षा होती. मात्र, येथेच जुईरुईने जोरदार मुसंडी मारताना सलग ७ गुण घेत १३-१२ असे सायनाला मागे टाकले. हाच सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरला आणि यानंतर जुईरुईने सायनाला फारशी संधी न देता दिमाखात विजेतेपद पटकावले.या सामन्यात सानियाला संभाव्य विजेती मानले जात होते. मात्र अनुभवी जुईरुईने सायना विरुद्धचा आपला शानदार रेकॉर्ड कायम राखताना सहज बाजी मारली. गतवर्षी चायना ओपन पटकावलेल्या सायनाची कामगिरी यानंतर चांगलीच उंचावली होती. २०१५ मध्ये तिने इंडिया ओपन सुपर सिरिज आणि इंडिया ग्रां. प्री. गोल्डचे विजेतेपद पटकावले. तर आॅल इंग्लंड आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.(वृत्तसंस्था)