शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सायना नेहवाल- पी. व्ही सिंधू सुवर्णपदकासाठी झुंजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 04:25 IST

भारतीय बॅडमिंटनच्या ‘पोस्टर गर्ल्स’ पी. व्ही. सिंधू व सायना नेहवाल राष्ट्रकुल स्पर्धेत महिला एकेरीमध्ये सुवर्णपदकासाठी झुंजणार आहे. त्यांनी शनिवारी उपांत्य फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध विजय मिळवला.

गोल्ड कोस्ट : भारतीय बॅडमिंटनच्या ‘पोस्टर गर्ल्स’ पी. व्ही. सिंधू व सायना नेहवाल राष्ट्रकुल स्पर्धेत महिला एकेरीमध्ये सुवर्णपदकासाठी झुंजणार आहे. त्यांनी शनिवारी उपांत्य फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध विजय मिळवला.२२ वर्षीय आॅलिम्पिक रौप्यपदकविजेती सिंधू टाचेच्या दुखापतीमुळे मिश्र सांघिक स्पर्धेत खेळू शकली नाही. तिने गतविजेती मिशेल लीचा २१-१८, २१-८ ने पराभव केला. जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू सायनाने २०१४ ची रौप्यपदक विजेती ख्रिस्टी गिलमोरची झुंज २१-१४, १८-२१, २१-१७ ने मोडून काढली. या दोन्ही खेळाडूंनी अंतिम फेरी गाठल्यामुळे भारताचे सुवर्ण व रौप्यपदक निश्चित झाले.२०१० च्या दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेची चॅम्पियन सायना व २०१४ ची कांस्यपदकविजेती सिंधू यांच्यादरम्यान गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सिनिअर राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये अंतिम लढत झाली होती. त्यात सायनाने बाजी मारली होती. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या किदाम्बी श्रीकांतने अंतिम फेरी गाठली आहे. त्याने पुरुष एकेरीत २०१० च्या राष्ट्रकुल रौप्यपदकविजेत्या इंग्लंडच्या राजीव ओसेफचा २१-१०, २१-१७ ने पराभव केला. तीनवेळचा आॅलिम्पिक रौप्यपदकविजेता लीग चोंग वेईने दुसऱ्या उपांत्य लढतीत भारताच्या एच. एस. प्रणयचा २१-१६, ९-२१, २१-१४ ने पराभव केला. प्रणयला त्यानंतर कांस्यपदकाच्या लढतीत राजीव ओसेफविरुद्ध २१-१७, २३-२५, ९-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. त्याआधी, सात्विक रंकीरेड्डी व चिराग शेट्टी जोडीने पुरुष दुहेरीत अंतिम फेरी गाठली. सात्विक-चिरागने श्रीलंकेच्या सचिन डायस व जी. बुवानेका याचा २१-१८, २१-१० ने पराभव केला.राष्ट्रकुल स्पर्धेतपुरुष दुहेरीत अंतिम फेरी गाठणारीही पहिली भारतीय जोडी ठरली.याव्यतिरिक्त पदक पटकावणारी पहिली भारतीय जोडीही ठरणार आहे. आता त्यांना अंतिम फेरीत रिओ आॅलिम्पिक कांस्पदक विजेत्या इंग्लंडच्या मार्कस एलिस व क्रिस लँगरिज यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. महिला दुहेरीत कांस्यपदकाच्या लढतीत अश्विनी पोनप्पा व एन. सिक्की रेड्डी जोडीने आॅस्ट्रेलियाच्या सेतयाना मापासा व ग्रोनया समरविले जोडीचा २१-१९, २१-१९ ने पराभव केला.

टॅग्स :Commonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८