ऑनलाईन लोकमतपॅरीस, दि.२१ - भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी कश्यप यांनी फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुस-या फेरीत धडक मारली आहे. महिला एकेरीमध्ये सायनाने कॅनडाच्या मिचेल ली हीचा २१-१८, २१-१३ अश्या सरळ सेट मध्ये पराभव करत दुसऱ्या फेरीत कूच केली, तर पी कश्यपने पुरुष एकेरी मध्ये थॉमस रॉक्सेल याचा २१-११. २२-२० असा फराभव केला.ऑलेम्पिक बाँज पदक विजेती सायना नेहवालला जर्मनीच्या स्नॅशे आणि जपानच्या मिनास्तू मिूतानी यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. डेन्मार्क ओपन मध्ये सायना आणि मिनास्तू मिूतानी यांच्यात सामना झाला होता.कॉमनवेल्थ पदक विजेता पी कश्यपचा सामना थायलंडचा तानोग्स्क आणि इंग्लडचा राजिव यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.
सायना नेहवाल, कश्यपची फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्या फेरीत धडक
By admin | Updated: October 21, 2015 19:41 IST