शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

सायना IOC अॅथलिट्स कमिशनच्या सदस्यपदी

By admin | Updated: October 18, 2016 14:10 IST

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC ) अॅथलिट्स कमिशनच्या सदस्यपदी सायनाची निवड करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत 
हैदराबाद,  दि. 18 - भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC ) अॅथलिट्स कमिशनच्या सदस्यपदी सायनाची निवड करण्यात आली आहे. 
 
यासंदर्भात आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी पाठवलेले पत्र  काल रात्री सायनाला मिळाले.  'सायना, आम्ही अत्यंत सन्मानाने तुझी आयओसीच्या अॅथलिट्स कमिशनच्या सदस्यपदी नियुक्ती करत आहोत', असे आयओसीने आपल्या पत्रात म्हटले आहे. या अॅथलिट्स कमिशनचे अध्यक्षपद अँजेला रुजारिओ भूषवत असून,  या कमिशनमध्ये नऊ उपाध्यक्ष आणि दहा सदस्य आहेत. या कमिशनची पुढील बैठक 6 नोव्हेंबला होणार आहे. 
 
दरम्यान, सायनाच्या आयओए अॅथलिट्स कमिशनच्या सदस्यपदी झालेल्या निवडीबद्दल  सायनाचे वडील हरवीर सिंग यांनी आनंद व्यक्त केला आहे. 'सायनाची आयओसी अॅथलिट कमिशनच्या सदस्यपदी निवड झाल्याचे वाचून मी भावनिक झालो आहे. ही बाब आमच्यासाठी सन्माननीय अशी आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये दुखापतीमुळे तिचे पदक हुकले. मात्र तरीही आम्हाला आमच्या मुलीचा अभिमान आहे,' असे ते म्हणाले .