हैदराबाद : गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीच्या खेळाडू आयोगाची सदस्य म्हणून नियुक्त झालेली बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल विश्व बॅडमिंटन महासंघ (बीडब्ल्यूएफ) मध्ये आयोगाची प्रतिनिधी म्हणून सहभागी होणार आहे. सायनाला याबाबतीत अधिकृत पत्र मिळाले आहे. गेल्या वर्षी रिओ आॅलिम्पिक संपल्यानंतर सायनाची नियुक्ती झाली होती. सायना सध्या जागतिक मानांकनात दहाव्या क्रमांकावर असून पुढील महिन्यात होणाऱ्या आॅल इंग्लंड चॅम्पियनशीपच्या तयारीत ती व्यस्त आहे. (वृत्तसंस्था)
आॅलिम्पिक समितीचे प्रतिनिधित्व सायनाकडे
By admin | Updated: February 26, 2017 23:58 IST