नवी दिल्ली : भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला रिओ आॅलिम्पिकमध्ये महिला एकेरीत पाचवे मानांकन मिळाले असून, पी. व्ही. सिंधूला नववे मानांकन आहे.किदाम्बी श्रीकांतला पुरुष एकेरीत नववे मानांकन मिळाले आहे. सायना जागतिक क्रमवारीत पाचव्या, तर सिंधू दहाव्या स्थानी आहे. श्रीकांत अकराव्या स्थानी आहे. जागतिक क्रमवारीच्या आधारावर गुरुवारी आॅलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना मानांकन देण्यात आले. एकेरीच्या प्रत्येक गटात १३ मानांकने देण्यात आले. मलेशियाचा ली चोंग वेई पुरुष विभागात, तर स्पेनची कॅरोनिला मारिन महिला विभागात अव्वल मानांकित खेळाडू आहेत. दोनदा जगज्जेतेपदाचा मान मिळवणारा चीनचा चेन लोंग याला दुसरे, तर दोनदा आॅलिम्पिक चॅम्पियन असलेला लिन डॅन याला तिसरे मानांकन देण्यात आले आहे. महिला एकेरीत चीनच्या वांग यिहानला दुसरे, तर गत आॅलिम्पिक चॅम्पियन ली शुरुईला तिसरे मानांकन मिळाले आहे. थायलंडची रेचानोक इंतानोनला चौथे मानांकन देण्यात आले आहे. दुहेरीमध्ये चार मानांकने देण्यात आली असून त्यात भारतीय जोडीचा समावेश नाही. (वृत्तसंस्था)
आॅलिम्पिकमध्ये सायनाला पाचवे मानांकन
By admin | Updated: July 22, 2016 05:26 IST