शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
2
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
3
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
4
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
5
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
6
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
7
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
9
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
10
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
11
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
12
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
13
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
14
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
15
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!
16
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडला, दिग्दर्शक प्रियदर्शन यांची आली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलून 'शहीद हिंदू घाटी पर्यटन स्थळ' करा, उच्च न्यायालयात याचिका
18
भाच्याच्या प्रेमासाठी पतीची हत्या करुन शेजाऱ्यांना पाठवलं जेलमध्ये, सत्य समजताच हादरले पोलीस
19
3 दिवसांत सर केली हिमालयाची 5 शिखरे, CISFच्या महिला अधिकाऱ्याची ऐतिहासिक कमगिरी
20
जम्मू-काश्मीरमधील सुरनकोट मंदिरावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; SIA कडून मोठा खुलासा

सायना-सिंधू लढत होण्याची शक्यता

By admin | Updated: September 1, 2015 00:02 IST

भारतीय महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू यांच्यादरम्यान पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या जपान ओपन सुपर सिरीज स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत लढत

टोकियो : भारतीय महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू यांच्यादरम्यान पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या जपान ओपन सुपर सिरीज स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत लढत होण्याची शक्यता आहे. पण, त्यासाठी उभय खेळाडूंनी पहिल्या फेरीचा अडथळा पार करणे आवश्यक आहे. विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदकाचा मान मिळविणाऱ्या सायनाला सलामीला जागतिक क्रमवारीत १७व्या स्थानावर असलेल्या थायलंडच्या बुसानन ओंगबुमरंगपानविरुद्ध खेळावे लागेल. विश्व चॅम्पियनशिपमध्ये दोनदा कांस्यपदकाचा मान मिळवणाऱ्या सिंधूला पहिल्या फेरीत जपानच्या मिनात्सू मितानीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. ८ ते १३ सप्टेंबर या कालावधीत रंगणाऱ्या या सुपर सिरीज स्पर्धेच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय पातळीवर सायना व सिंधू यांच्यादरम्यान दुसऱ्यांदा लढत होण्याची शक्यता आहे. यापूर्वी २०१४मध्ये इंडिया ग्रांप्री गोल्ड स्पर्धेच्या अंतिम फेरीत फेरीत उभय खेळाडूंदरम्यान लढत झाली होती. त्यात सायनाने बाजी मारली होती. यंदा इंडोनेशिया ओपन सुपर सिरीज स्पर्धेत उभय खेळाडूंदरम्यान उपांत्य फेरीत गाठ पडण्याची शक्यता होती. अन्य भारतीय खेळाडूंमध्ये चौथे मानांकन प्राप्त किदाम्बी श्रीकांत पुरुष एकेरीमध्ये मानांकन असलेला एकमेव भारतीय खेळाडू आहे. त्याला सलामी लढतीत आयर्लंडच्या स्कॉट इव्हांसच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. राष्ट्रकुल चॅम्पियन पारुपल्ली कश्यपची पहिल्या फेरीत गाठ ताकुमा युएडाविरुद्ध पडेल, तर डच ओपनविजेता अजय जयराम याला सातवे मानांकनप्राप्त डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. एच.एस. प्रणय हाँगकाँगच्या वोंग विंग की विन्सेटविरुद्ध खेळणार आहे. महिला दुहेरीमध्ये ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा यांना पहिल्या फेरीत आठव्या मानांकित चीनच्या झाओ युनलेई व झोंग कियांशिन यांच्याविरुद्ध खेळावे लागेल. (वृत्तसंस्था)