शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

‘विराट’ खेळीवर सचिनचे ‘ट्विट’

By admin | Updated: February 12, 2017 05:28 IST

बांगलादेशविरुद्ध २०४ धावांची धमाकेदार खेळी करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही विराट कोहलीचे आपल्या विशेष

हैदराबाद : बांगलादेशविरुद्ध २०४ धावांची धमाकेदार खेळी करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही विराट कोहलीचे आपल्या विशेष शैलीत कौतुक केले. ट्विटरच्या माध्यमातून सचिनने आपल्या भावना व्यक्त करत विराटला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘तुझ्या बॅटवर असलेला स्वीट स्पॉट तू किती जबरदस्त फॉर्ममध्ये आहेस हे सांगतं. त्यासाठी स्कोअरबोर्डची गरज नाही. देव करो तुझी बॅट नेहमी अशीच राहो', असं टिष्ट्वट सचिन तेंडुलकरने केले. सचिन तेंडुलकरच्या या गोड आणि आत्मविश्वास वाढवणा-या ट्विटमुळे विराट कोहली नक्कीच आनंदित झाला असेल. विराट कोहली ५४ वा कसोटी सामना खेळत आहे. यादरम्यान त्याने १६ शतके आणि १४ अर्धशतकांच्या मदतीने ४४१३ धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकरच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, सचिनने ४९.८२ च्या सरासरीने ३४३८ धावा केल्या होत्या. सचिन तेंडुलकरने ५४ कसोटी सामन्यांमध्ये ११ शतके आणि १६ अर्धशतके झळकावली होती.बांगलादेशविरोधात दुसऱ्या दिवशी खेळताना विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधील चौथं द्विशतक साजरे केले. ही सलग चौथी मालिका आहे ज्यामध्ये विराट कोहलीने द्विशतक केलं. याअगोदर सर डॉन ब्रॅडमॅन आणि राहुल द्रविड यांनी सलग तीन कसोटी मालिकांमध्ये द्विशतक करण्याचा विक्रम केला होता. भारताकडून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सहा द्विशतके झळकावली आहेत. तर राहुल द्रविडने पाच वेळा द्विशतक लगावले आहे. (आॅनलाईन लोकमत) - विराट कोहलीने अजून एक नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला. विराट कोहलीने मायदेशात एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. - विराट कोहलीने १५ डावांत १११६ धावा केल्या आहेत. यासोबतच विराट कोहलीने वीरेंद्र सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. - वीरेंद्र सेहवागने २००४-०५ मध्ये १७ डावांत ६९.०६ च्या सरासरीने ११०५ धावा केल्या होत्या.