मुंबई : सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या धामधुमीमध्ये मुंबई इंडियन्सचा सामना असल्यावर स्टेडियममध्ये एक जयघोष नक्कीच होतो तो म्हणजे ‘सचिन...सचिन..’ नोव्हेंबर २०१३ साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची क्रेझ आजही कमी झाली नसल्याची ही प्रचितीच आहे. तमाम क्रिकेटप्रेमींचा ‘देव’ असलेल्या ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज ४३व्या वर्षांत पदार्पण केले. आज देशभरात ठिकठिकाणी क्रिकेटप्रेमी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून सचिनवर शुभेच्छांचा वर्षाव करतील.दुसऱ्या बाजूला या दिवशी प्रसिद्धीच्या झोतापासून दूर पळणारा सचिन दरवर्षी आपल्या परिवारासोबत वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे यंदा सचिन वाढदिवस कुठे व कसा साजरा करणार, याची उत्सुकता सर्वच क्रिकेटप्रेमींना पडली असणार.
सचिनचे ४३व्या वर्षात पदार्पण
By admin | Updated: April 24, 2015 00:25 IST