शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सचिनला खालच्या क्रमावर खेळवू इच्छित होतो!

By admin | Updated: February 14, 2015 00:28 IST

वेस्ट इंडीजमध्ये २००७ साली झालेल्या विश्वचषकादरम्यान सचिन तेंडुलकर याला खालच्या स्थानावर खेळण्याचा आग्रह

मेलबोर्न : वेस्ट इंडीजमध्ये २००७ साली झालेल्या विश्वचषकादरम्यान सचिन तेंडुलकर याला खालच्या स्थानावर खेळण्याचा आग्रह करताच आम्हा दोघांमध्ये खटके उडले. संबंधही दुरावले, असे स्पष्टीकरण टीम इंडियाचे माजी कोच ग्रेग चॅपेल यांनी दिले.सचिनने ‘प्लेर्इंग इट माय वे’ या आत्मकथेत आॅस्ट्रेलियाच्या या माजी कर्णधारावर हल्लाबोल करीत ‘रिंगमास्टर’ संबोधले होते. काही महिन्यानंतर ६६ वर्षांच्या चॅपेल यांनी स्पष्टीकरण दिले. ‘फॉक्स स्पोटर््स’च्या ‘क्रिकेट लिजेंड्स’ या कार्यक्रमात चॅपेल म्हणाले, ‘सचिनला मी खालच्या क्रमावर फलंदाजी करण्याचा सल्ला दिला होता. सुरुवातीला तो तयारही झाला. पण, नंतर मतपरिवर्तन करीत नकार दिला होता. संघाला असलेल्या गरजेनुसार सचिन वागेल, असे मला वाटले होते. पण, सचिनला जे वाटायचे, तेच तो करायचा.’ २००७च्या विश्वचषकात भारत पहिल्याच फेरीत बाहेर झाला, हे विशेष.डावाची सुरुवात करणे ही सचिनची पसंती होती. पण, विंडीजमध्ये सचिनने खालच्या स्थानावर खेळण्याची संघाला गरज होती. वरच्या स्थानावर खेळणारे अनेक जण संघात होते. पण, खालच्या स्थानावर खेळणारे कुणी नव्हते, ही समस्याच होती. सचिन सुरुवातीला तयार झाला. नंतर मात्र माझ्याकडून असे होणार नाही, असे म्हणाला. मी खालच्या क्रमावर खेळण्यास त्याला भाग पाडले. तेव्हापासून आम्हा दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाल्याचे चॅपेल यांनी नमूद केले.सचिनने स्वत:च्या पुस्तकात याचे वर्णन केले आहे. तो म्हणतो, ‘विश्वचषकाच्या काही महिन्यांपूर्वी चॅपेल माझ्या घरी भेटायला आले. राहुल द्रविड याच्याकडून कर्णधारपदाची सूत्रे तू घे, असा त्यांनी सल्ला दिला, तेव्हा मी आश्चर्यचकित झालो होतो.’चॅपेल यांनी माजी कर्णधार सौरव गांगुली याचे नाव न घेता त्याच्यावरही शरसंधान साधले. ‘टीम इंडिया जगातील सर्वश्रेष्ठ संघ बनावा, यासाठी प्रयत्न करण्याचे सोडून स्वत:चे स्थान टिकविणे भारतीय क्रिकेटमधील मोठी समस्या आहे,’ या शब्दांत चॅपेल यांनी गांगुलीला धारेवर धरले. ते पुढे म्हणाले, ‘सौरव संघात स्थान टिकविण्यात धन्यता मानायचा. मी त्याला सलग चांगल्या कामगिरीसाठी प्रोत्साहन द्यायचो. (वृत्तसंस्था)