शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

‘सचिन अ बिलियन ड्रीम’चे ट्रेलर रिलीज

By admin | Updated: April 13, 2017 19:54 IST

प्रत्येक क्रिकेट रसिकाला सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच सचिन अ बिलियन ड्रीम या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 13 - प्रत्येक क्रिकेट रसिकाला सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच सचिन अ बिलियन ड्रीम या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला आहे. सचिन तेंडुलकर याने आपल्या ट्विटरवरुन ट्रेलर रिलीज केले आहे. यामध्ये सचिनच्या आयुष्यात घडलेल्या घटनेचा प्रवास दाखवण्यात आला आहे. सचिन कसा घडला याचे चित्रण करण्यात आले आहे.

या ट्रेलरमधील सचिनची काही वाक्यं अक्षरश: मनाचा ठाव घेणारी आहेत. क्रिकेट खेळणं हे माझ्यासाठी मंदिरात जाण्यासारखं होतं. असं म्हणत सचिननं या ट्रेलरमध्ये आपली क्रिकेटविषयी असणारी भावना व्यक्त केली आहे. या सिनेमात खुद्द सचिन तेंडुलकरनं भूमिका साकारली आहे. हा सिनेमा वास्तवावर बेतलेला असल्यानं याचा ट्रेलरही तसाच करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानं केला आहे. यात सचिन आणि त्याच्या कुटुंबीयांची काही जुनी दृश्यही दाखवण्यात आली आहे. प्रत्येक क्रिकेटरच्या स्वप्नातील सचिन तेंडूलकरचा प्रवास सचिन अ बिलियन ड्रीम या त्याच्या आयुष्यावर आधारित चित्रपटातून पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. चित्रपटापूर्वी सचिन प्लेइंग विथ माय वे या आत्मचरित्राच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचला होता. त्याच्या आयुष्यातील अगदी महत्त्वाच्या गोष्टी पुस्तकाच्या माध्यमातून समोर आल्यानंतर देखील त्याच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाबद्दल तमाम भारतीयांमध्ये उत्सुकता दिसून येते. नुकतेच सचिनने 100 एमबी हे अ‍ॅप लाँच केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यामातून सचिन आपल्या चाहत्याशी कनेक्ट राहत आहे.जेम्स अर्सकाईन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारित सचिन अ बिलियन ड्रीम या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून हा चित्रपट 26 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मराठी अभिनेता मयुरेश पेम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा भाऊ नितीन तेंडुलकरची भूमिका साकारत आहे.