शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
2
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
3
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
4
पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
5
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
6
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
7
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 
8
पत्नीला १७ वर्षांच्या मुलासोबत त्या अवस्थेत पाहिलं, पतीचं डोकं भडकलं, सिलेंडर उचलला आणि....
9
जगात भारी... Mumbai Indiansच्या जसप्रीत बुमराहने IPL मध्ये केला सर्वात 'जम्बो' विक्रम, 'हा' पराक्रम करणारा ठरला पहिलाच क्रिकेटर
10
चाललंय तरी काय? रोहित- विराटनंतर आणखी एका स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
11
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
12
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
13
Astrology: जून देणार 'या' पाच राशींच्या नशिबाला गती, येणार अच्छे दिन, बदलणार स्थिती!
14
IPL 2025 Final वरून मोठा राडा ! BCCI च्या निर्णयावर बंगाल सरकारचा घणाघाती आरोप
15
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
16
IPL 2025: शुभमन गिल- ऋषभ पंतमध्ये वाद सुरू? मैदानातील व्हिडीओ समोर आल्यानंतर चर्चांना उधाण
17
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
18
Shani Dosha: शनि महादशेचा त्रास तान्ह्या बाळांनाही होतो का? काय आहे त्यावर उपाय? जाणून घ्या!
19
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
20
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!

सनरायझर्सला नमविण्याचे रॉयल्सचे ‘लक्ष्य’

By admin | Updated: May 7, 2015 03:45 IST

दिल्ली डेअरडेव्हिल्सला नमवित पराभवाची मालिका खंडित करणाऱ्या राजस्थान रॉयल्सने आयपीएल-८ मध्ये गुरुवारी सनरायझर्स हैदराबादला नमविण्यासह ‘प्लेआॅफ’ गाठण्याचे ‘लक्ष्य’ आखले आहे.

मुंबई : दिल्ली डेअरडेव्हिल्सला नमवित पराभवाची मालिका खंडित करणाऱ्या राजस्थान रॉयल्सने आयपीएल-८ मध्ये गुरुवारी सनरायझर्स हैदराबादला नमविण्यासह ‘प्लेआॅफ’ गाठण्याचे ‘लक्ष्य’ आखले आहे. रॉयल्सने सलग पाच सामने जिंकून विजयी सुरुवात केली, पण त्यानंतर ओळीने तीन सामने गमावले. शिवाय दोन सामने पावसात वाहून गेले. रविवारी या संघाने दिल्लीवर विजय नोंदवित विजयाची गाडी पुन्हा रुळावर आणली. शेन वाटसनच्या नेतृत्वाखालील रॉयल्सचे मनसुबे हैदराबादला नमवून प्लेआॅफ गाठण्याचे असतील. सनरायझर्सची वाटचाल चढउताराची ठरली. १६ एप्रिलला विशाखापट्टणममध्ये रॉयल्सने हैदराबादचा सहा गड्यांनी पराभव केला होता. त्या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी हैदराबादकडे असेल. सनरायझर्स सांघिक खेळात अपयशी ठरले. शनिवारी अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या चेन्नईवर २२ धावांनी विजय मिळविला; पण केकेआरकडून पराभवाचा धक्का बसला. सनरायझर्स संघ कर्णधार डेव्हिड वॉर्नर तसेच शिखर धवन यांच्यावर विसंबून आहे. हे दोघे चांगली सुरुवात करण्यास अपयशी ठरताच अन्य फलंदाज नांगी टाकतात.डेल स्टेन, ट्रेंट बोल्ट, भुवनेश्वर कुमार आणि प्रवीण कुमार यांच्या उपस्थितीत संघाचा वेगवान मारा भक्कम आहे. पण फिरकी मारा कमकुवत वाटतो. ही उणीव दूर करण्यासाठी लेगस्पिनर कर्ण शर्माच्या जोडीला डावखुरा विपुल शर्मा याचा संघात समावेश करण्यात आला. रॉयल्सकडे स्पर्धेत सर्वाधिक धावा ठोकणारा अजिंक्य रहाणे, कर्णधार वॉटसन आणि स्टीव्हन स्मिथ यांचा भरणा आहे. संजू सॅमसन तसेच करुण नायर यांनीदेखील प्रभावी कामगिरी केल्याने आघाडीच्या तिन्ही फलंदाजांवरील ताण कमी झाला. गोलंदाजीत या संघाकडे टीम साऊदी, धवल कुलकर्णी व खुद्द वॉटसन हे विरोधी फलंदाजांना घाम फोडू शकतात.(वृत्तसंस्था)हेड टू हेडराजस्थान रॉयल्स आणि सनराइझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ६ लढती झाल्या आहेत. यामध्ये राजस्थानने ४ तर हैदराबादने २ सामन्यांत विजय संपादन केला आहे.राजस्थान रॉयल्स शेन वॉटसन : (कर्णधार), अभिषेक नायर, अजिंक्य रहाणे, अंकित शर्मा, बेन कटिंग, दीपक हुड्डा, धवल कुलकर्णी, दिशांत याग्निक, जेम्स फॉल्कनर, केन रिचर्डसन, करुण नायर, प्रवीण तांबे, राहुल तेवटिया, रजत भाटिया, संजू सॅमसन, स्टीवन स्मिथ, स्टुअर्ट बिन्नी, टीम साऊदी, विक्रमजित मलिक, ख्रिस मॉरिस, ज्युुआॅन थेरोन, बरिंदरसिंग सरन, दिनेश साळुंके, सागर त्रिवेदी, प्रदीप साहू. सनरायझर्स हैदराबाद डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, नमन ओझा, केन विलियम्सन, डेल स्टेन, मोझेस हेनरिक्स, इयान मॉर्गन, रवी बोपारा, ट्रेंट बोल्ट, परवेझ रसूल, कर्ण शर्मा, भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा, आशीष रेड्डी, रिकी भुई, चामा मिलिंद, लक्ष्मीरतन शुक्ला, प्रवीण कुमार, हनुमान विहारी, प्रशांत पद्मनाभन व सिद्धार्थ कौल.