शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रॉयल चॅलेंजर्सला केकेआरचे चॅलेंज

By admin | Updated: April 11, 2015 04:32 IST

भारीभक्कम फलंदाजीक्रम लाभलेला ‘स्टार स्टडेड’ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला आयपीएलमध्ये शनिवारी गतचॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध कठीण चॅलेंज स्वीकारावे लागणार आहे.

कोलकाता : भारीभक्कम फलंदाजीक्रम लाभलेला ‘स्टार स्टडेड’ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला आयपीएलमध्ये शनिवारी गतचॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध कठीण चॅलेंज स्वीकारावे लागणार आहे.गेल्या तीन पर्वांत दोनदा जेतेपदाचा शिरपेच खोवणाऱ्या केकेआरने २०१४ पासून आतापर्यंत सलग १४ सामने जिंकले आहेत. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील संघाला नमविणे इतरांसाठी फार कठीण होऊन बसले आहे.आरसीबीकडे कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सच्या रूपात आक्रमक फलंदाज आहेत, तर दुसरीकडे कोलकाता संघात जो ताळमेळ दिसतो त्याला पर्याय नाही. मुंबईविरुद्ध पहिल्याच सामन्यात केकेआरकडून द. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मोर्नी मॉर्केल याने १८ धावांत दोन गडी बाद केले. गंभीरने ५७, मनीष पांडे ४० आणि सूर्यकुमार यादवने नाबाद ४६ धावांचे योगदान देत विजय साकार केला होता.कर्णधार विराटच्या नेतृत्वाखाली बेंगळुरुची फलंदाजी भक्कम असली तरी ईडनगार्डनवर विजयासाठी या संघाला मोठा घाम गाळावा लागणार आहे. कोहलीसह डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल हे फलंदाजीत आकर्षण आहेत, पण त्यांची बॅट कशी तळपते, यावर विजयाचे समीकरण विसंबून राहील. आरसीबी २००९ आणि २०११ चा उपविजेता आहे. मिशेल स्टार्क आणि न्यूझीलंडचा अ‍ॅडम मिल्ने यांच्या अनुपस्थितीत या संघाची गोलंदाजी काहीशी कमकुवत वाटते. आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज सीन एबोट, अशोक डिंडा आणि वरुण अ‍ॅरॉन हे वेगवान मारा सांभाळतील, तर फिरकीची जबाबदारी यजुवेंद्र चहल आणि इक्बाल अब्दुल्ला यांच्या खांद्यावर असेल. (वृत्तसंस्था)