शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

रोनाल्डोचे स्वप्न भंगले, पण पोर्तुगालने पहिल्यांदाच पटकावला युरो चषक

By admin | Updated: July 11, 2016 03:23 IST

सेंट डेनिस स्टेडियमवरील हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने पोर्तुगालने पहिल्यांदा ‘युरो चषक’ जिंकला. यापूर्वी त्यांनी २00४ साली उपविजेतेपद मिळवले होते.

ऑनलाइन लोकमतपॅरिस, दि. ११:  युरो चषक २०१६ फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रविवारी रात्री पोर्तुगालने यजमान फ्रान्सला १-0 गोल फरकाने हरवून आपणच युरोप खंडाचा नवा फुटबॉल किंग असल्याचे सिद्ध केले. सामन्यातील एकमेव विजयी गोल बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या इदरने अतिरिक्त वेळेत १0९ व्या मिनिटाला केला. सेंट डेनिस स्टेडियमवरील हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने पोर्तुगालने पहिल्यांदा ‘युरो चषक’ जिंकला. यापूर्वी त्यांनी २00४ साली उपविजेतेपद मिळवले होते. 

रविवारच्या सामन्यासाठी फ्रान्सने जर्मनीविरुद्धचा सेमीफायनलचा संघ कायम ठेवला, तर पोर्तुगाल संघात दोन बदल करण्यात आले. मागील सामन्याला मुकलेले पेपे आणि विल्यम कार्वाल्हो यांचा अंतिम ११ जणांत समावेश करण्यात आला.

सामन्याच्या चौथ्या मिनिटाला पोर्तुगालच्या नानीला चांगली संधी आली होती; परंतु त्याचा फटका गोलपोस्टच्या वरून गेला. त्यानंतर फ्रान्सने चेंडूवर ताबा मिळवून पोर्तुगीज गोलपोस्टवर दोन हल्ले चढविले; पण गोलकिपर रुई पॅट्रीशियोने ग्रिझमनचा हेडर शिताफीने बाहेर काढला, तर गिरौडच्या फटक्यावर कब्जा मिळविला. ३३ व्या मिनिटाला फ्रान्सच्या मौसा सिसोकोचा थेट फटका पॅट्रीशियाने तितक्याच चपळाईने परतविला. दोन्ही संघांच्या प्रयत्नांना यश न आल्याने मध्यंतराला सामना गोलशून्य बरोबरीत होता.

उत्तरार्धात रोनाल्डोच्या अनुपस्थितीचा फायदा घेत फ्रान्सने आपले आक्रमण तेज केले. त्यांच्या ग्रिझमन, गिरौड, पोग्बा यांनी दोन्ही बाजूंनी मोर्चे लावले; पण हे सगळे प्रयत्न पॅट्रीशियोने हाणून पाडले. 

८0 व्या मिनिटाला पोर्तुगालचा फॉरवर्डर नानीने जवळजवळ २0 मीटरवरून फटका मारला. फ्रान्सचा गोलकिपर हुगो लोरिसने तो तटवला खरा; पण त्याला तटून आलेला चेंंडू क्वारेझ्माने सायकल कीक मारून उत्कृष्टरीत्या गोलपोस्टकडे परतवला; पण तोही चेंडू गोलकिपरने ब्लॉक केला. पूर्ण वेळेच्या शेवटच्या क्षणाला फ्रान्सला एक सुवर्णसंधी आली होती. परंतु, जिग्नॅक आणि ग्रिझमनच्या हातून ती निसटली आणि सामना गोलशून्य बरोबरीमुळे अतिरिक्त वेळेत गेला.

अतिरिक्त वेळेत वेळेच्या पूर्वार्धात १0४ व्या मिनिटाला पोर्तुगालची संधी निसटली. क्वारेझ्माच्या कॉर्नरला इदरने हेडरद्वारे गोलपोस्टकडे ढकलले; पण गोलकिपरने त्याला ब्लॉक केले.

१५ मिनिटांच्या दुसऱ्या अतिरिक्त वेळेत १0८ व्या मिनिटाला राफेलची फ्री कीक फ्रान्सच्या लोरिसने शानदारपणे तटवली. १0९ व्या मिनिटाला पोर्तुगालचे भाग्य फळफळले. फ्रान्सच्या बचावफळीतील गोंधळाचा फायदा घेत इदरने २० मीटरपासून टोलवत आणलेला चेंडू सरळ गोलपोस्टकडे ढकलला. फ्रान्सच्या गोलकिपरने घेतलेली झेप त्याला अडवू शकली नाही. चेंडू शांतपणे गोल जाळीत विसावला आणि पोर्तुगालचा ऐतिहासिक विजयी गोल झाला.अंतिम सामन्यात गोल नोंदवण्याचे रोनाल्डोचे स्वप्न भंगलेदहाव्या मिनिटाला पोर्तुगालचा रोनाल्डो जखमी झाला. फ्रान्सच्या पायेटशी झालेल्या झटापटीत त्याचा पाय दुखावला. काही मिनिटे मैदानाबाहेर उपचार घेऊन तो मैदानात परतला; पण त्याला पळताना वेदना होत होत्या. १६व्या मिनिटाला वेदना वाढल्याने त्याने मैदान सोडले. चार मिनिटे उपचार घेऊन तो पुन्हा आत आला. २४ व्या मिनिटाला मात्र त्याला पाय उचलणेही मुश्कील झाल्याने त्याने सामन्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अंतिम सामन्यात गोल नोंदवण्याचे त्याचे स्वप्न अखेर भंगले. रिकार्डो क्वारेझ्माला त्याच्या जागी रिप्लेस करण्यात आले.