शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

रोहित, विराटची अर्धशतके, भारताचे ऑस्ट्रेलियासमोर १८५ धावांचे लक्ष्य

By admin | Updated: January 29, 2016 16:00 IST

रोहित शर्मा (६०) आणि विराट कोहलीच्या (५९) धडाकेबाज अर्धशतकाच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर १८५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. २० षटकात भारताने ३ गड्याच्या मोबदल्यात १८४ धावा केल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत

मेलबर्न, दि. २९ -  रोहित शर्मा (६०) आणि विराट कोहलीच्या (५९) धडाकेबाज अर्धशतकाच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर १८५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. २० षटकात भारताने ३ गड्याच्या मोबदल्यात १८४ धावा केल्या आहेत. 
 
शिखर धवन आणि रोहित शर्मा या सलामीवीरांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या ट्‌वेंटी-२० सामन्यात पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा स्वीकारला. रोहित शर्मा (६०) आणि शिखर धवन (४२) यांच्या धडाकेबाज फलंदाजी करत पहिल्या १३ षटकात ११० धावांची सलामी दिली. जॉन हेस्टिंग, जेम्स फॉकनर यांना धवन-रोहितच्या आक्रमतेचा फटका बसला. फॉकनरच्या पहिल्या दोन षटकांतच भारतीय सलामीवीरांनी २७ धावा चोपल्या. 
 
रोहित शर्माने धडाकेबाज अर्धशतक केले तर धवन ४२ धावावर बाद झाला. रोहित शर्मा धावबाद झाल्यानंतर विराट कोहलीने सामन्याची सर्व सुत्रे आपल्या हाती घेतली, कोहलीने ७ चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने ३३ चेंडूत ५९ धावा केल्या. कोहलीने कर्णधार धोणीच्या साथीने संघाला १८४ धावापर्यंत नेहले. धोणीने आज फलंदाजीस लवकर येत सर्वानाच धक्का दिला. धोणीने ९ चेंडूत २ चौकाराच्या मदतीने १४ धावांचे योगदान दिले. सुरेश रैना एकही चेंडू न खेळता नाबाद राहिला. 
ऑस्ट्रेलियातर्फे ग्लेन मॅक्‍सवेल आणि अँड्रयू टाय यांनी प्रत्येकी एका फंलदाजाला बाद केले. 
 
मालिका वाचविण्यासाठी मैदानात उतरणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या दुस-या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या टी २० सामन्यात भारतीय संघात कोणताही बदल केला नाही. तर ऑस्ट्रेलिया संघात ३ बदल करण्यात आले आहेत. पहिला सामना ३७ धावांनी जिंकून भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना जिंकल्यास सिडनीत अखेरच्या टी-२० त प्रयोग करण्याची भारताला संधी असेल
उभय संघ
भारत - 
रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, युवराजसिंग, महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर. आश्‍विन, आशिष नेहरा, जसप्रित बुमराह. 
ऑस्ट्रेलिय
ऍरॉन फिंच (कर्णधार), शॉन मार्श, ख्रिस लिन, ग्लेन मॅक्‍सवेल, शेन वॉटसन, मॅथ्यू वेड, जेम्स फॉकनर, जॉन हेस्टिंग्ज, स्कॉट बोलॅंड, अँड्रयू टाय, नॅथन लिऑन