शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

कर्णधार म्हणून रोहित परिपक्व होत आहे

By admin | Updated: May 27, 2015 01:34 IST

महान क्रिकेटपटू व मुंबई इंडियन्सचा आयकॉन सचिन तेंडुलकरने आयपीएलमधील चॅम्पियन झालेल्या संघाचा कर्णधार रोहित शर्माची प्रशंसा केली.

कोलकाता : महान क्रिकेटपटू व मुंबई इंडियन्सचा आयकॉन सचिन तेंडुलकरने आयपीएलमधील चॅम्पियन झालेल्या संघाचा कर्णधार रोहित शर्माची प्रशंसा केली. गेल्या काही वर्षांत रोहित कर्णधार म्हणून परिपक्व होत आहे, असे सचिन म्हणाला.तेंडुलकर पुढे म्हणाला,‘ज्यावेळी रोहितने प्रथम मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारले होते त्याची तुलना आजच्या रोहितसोबत केली तर तो आज चांगला कर्णधार असल्याचे दिसून येईल. रोहितचा आत्मविश्वास उंचावलेला असल्याचे आता दिसून येते. मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून त्याला अनेकदा उतार-चढाव अनुभवाला मिळालेले आहे. आव्हानाला सामोरे गेल्यानंतरच चांगला खेळाडू होता येते.’रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपरकिंग्जचा पराभव करीत दुसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. तेंडुलकर म्हणाला, ‘यंदाच्या मोसमात रोहितने उपलब्ध पर्यायांचा चांगला वापर केला. बैठकीमध्ये व ड्रेसिंग रुममध्ये आखलेल्या योजना त्याने मैदानावर योग्यपणे लागू केल्या. गोलंदाजांकडून मिळालेल्या फिडबॅकवर कर्णधाराबाबत बरेच काही सांगता येते. गोलंदाज नेहमी कर्णधाराने ठरवलेल्या रणनीतीनुसार गोलंदाजी करतो. बंद रुममध्ये आम्ही अनेक योजना ठरवू शकतो, पण कर्णधार, गोलंदाज व क्षेत्ररक्षकच त्या योजना सत्यात उतरवू शकतात.’ यंदाच्या मोसमात सलग ४ पराभव स्वीकारणाऱ्या मुंबई इंडियन्सने केलेले पुनरागमन शानदार होते, असे सचिन म्हणाला.सचिनने सांगितले, ‘आमची सुरुवात लौकिकाला साजेशी नव्हती, पण ही कसोटीची वेळ होती. त्यावेळी खेळाडूंनी सांघिक भावनेचा परिचय दिला आणि कसून मेहनत घेतली. हे विजेतेपद म्हणजे केवळ योगायोग नसून आम्ही घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. निकाल बदलण्याची क्षमता असल्याचा आम्हाला विश्वास होता. सुरुवात कशी झाली याला काही अर्थ नसून शेवट कसा झाला, हे अधिक महत्त्वाचे असते. सलग पराभव स्वीकारावे लागल्यानंतरही आमचा आत्मविश्वास डगमगला नव्हता. आम्हाला आमच्या क्षमतेवर विश्वास होता. हे सत्र कठीण आहे व आमचे भविष्य चांगले नाही, असे एकाही खेळाडूला वाटत नव्हते. आम्हाला नेहमी आशेचा किरण दिसत होता.’सचिनने आॅस्ट्रेलियाचे माजी कर्णधार व मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांची विशेष प्रशंसा केली. (वृत्तसंस्था)