लंडन : स्वित्ङरलडचा अनुभवी टेनिसपटू रॉजर फेडरर याने एटीपी टूर फायनल्समध्ये उत्कृष्ट खेळ करताना राऊंड रॉबिन सामन्यात जपानच्या केई निशिकोरीला धूळ चारून आगेकूच केली़ दुस:या लढतीत ब्रिटनचा अनुभवी खेळाडू अँडी मरे याने प्रतिस्पर्धी खेळाडूंवर शानदार विजय मिळविला़
जागतिक क्रमवारीत दुस:या स्थानावर असलेल्या फेडररने ब गटातील राऊंड रॉबिन सामन्यात जबरदस्त खेळ करून निशिकोरी याचे आव्हान सरळ सेटमध्ये 6-3, 7-5 असे मोडून काढले. तर, अँडी मरेने मिलोस राओनिकला 6-3, 7-5ने पराभूत
करून स्पर्धेत आपले आव्हान कायम राखल़े
स्पर्धेच्या पुढच्या फेरीत आता फेडररचा सामना अँडी मरे याच्याशी होईल,तर पराभूत झालेला राओनिक आणि निशिकोरी स्पर्धेत आपले स्थान कायम राखण्यासाठी आमनेसामने येतील़ त्याआधी, रविवारी झालेल्या सामन्यात निशिकोरीने मरेला पराभवाचा धक्का दिला होता़
आता निशिकोरीला राओनिककडून पराभवाचा सामना करावा लागला, तर मरे स्पर्धेतून बाहेर होईल़ दुसरीकडे, फेडररने मरेवर मात केल्यास तो उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करेल़ मरेला अंतिम 4 खेळाडूंत पोहोचण्यासाठी फेडररला सरळ सेटमध्ये पराभूत करावे
लागणार आह़े(वृत्तसंस्था)
स्पर्धेत सलग दोन्ही सामन्यांत मिळविलेल्या विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेला आह़े आता मरेविरुद्धच्या सामन्यातही विजय मिळवून उपांत्य फेरीत जागा पक्की करण्याचे लक्ष्य आह़े हे लक्ष्य निश्चित पूर्ण करेन, असा विश्वास आह़े
- रॉजर फेडरर,
टेनिसपटू, स्वित्ङरलड