नवी दिल्ली : सतरा ग्रँडस्लॅम जिंकणारा स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आगामी आंतरराष्ट्रीय प्रीमिअर टेनिस लीग (आयपीटीएल) स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळणार असल्याचे स्पर्धेचा आयोजक महेश भूपती याने टिष्ट्वट केले. भूपतीच्या या माहितीने भारतातील फेडररच्या चाहत्यांना त्याला प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे. पीट साम्प्रास, गील मोफिंल्स, अॅना इव्हानोविच, सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना यांचा समावेश असलेल्या भारताचे नेतृत्व फेडरर करणार आहे. मात्र, राफेल नदालने दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. दुखापतीमुळे आपण या स्पर्धेतून माघार घेत असून, मला त्याची खंत असल्याचे नदालने आयोजकांना कळविले होते. या २८ वर्षीय स्पॅनिश खेळाडूने गत महिन्यात झालेल्या यु एस ओपनमधूनही माघार घेतली होती. नदाल आणि निवृत्त अमेरिकन खेळाडू साम्प्रास हे दोघेही भारतीय संघात जोडीने खेळणार होते; मात्र नदालच्या माघारीमुळे फेडररला एन्ट्री मिळाली.
रॉजर फेडरर करणार भारताचे नेतृत्व!
By admin | Updated: September 23, 2014 05:48 IST