बुडापेस्ट : युवा महिला मल्ल रितू मलिकने बुधवारी विश्व कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदकाच्या प्ले आॅफमध्ये स्थान पटकवित आशा कायम राखल्या. साक्षी मलिक वा रितू फोगाट यांना मात्र दारुण पराभव पत्करावा लागला. रितूने रेपेचेसमध्ये माघारल्यानंतरही बल्गेरियाची सोफिया रिस्तोवचा ९-६ असा पराभव केला. पहिल्या फेरीत ती ०-३ ने माघारली होती. दुसऱ्या फेरीत चार गुणांची कमाई करीत आघाडी घेतली. रिस्तोवने लवकरच आघाडी मिळविली खरी पण रितूने पुन्हा चार गुण घेत सामना ९-६ ने जिंकला. कांस्य पदकाच्या लढतीत तिला विश्व सुवर्ण विजेती जपानची आयना गेम्पेईविरुद्ध खेळावे लागेल. साक्षी मलिकला मात्र ६२ किलो वजन गटात जपानच्या युकाको कवाई हिने १६-२ अशी सहज धूळ चारली. ५० किलो गटात रितू फोगाट युसाकीकडून पराभूत झाली.
रितू मलिक कांस्यच्या शर्यतीत कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 04:17 IST