शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

रिओ आॅलिम्पिक : आयओसीला लाच देऊन खरेदी केले यजमानपद,ब्राझील पोलिसांचा खळबळजनक खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:35 IST

आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीला (आयओसी) लाच देऊन रिओ आॅलिम्पिकचे यजमानपद खरेदी करण्याचा कट देशाच्या आॅलिम्पिकप्रमुखांनी रचल्याचा खळबळजनक खुलासा ब्राझील पोलिसांनी केला आहे.

रिओ : आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीला (आयओसी) लाच देऊन रिओ आॅलिम्पिकचे यजमानपद खरेदी करण्याचा कट देशाच्या आॅलिम्पिकप्रमुखांनी रचल्याचा खळबळजनक खुलासा ब्राझील पोलिसांनी केला आहे.२०१६ च्या आॅलिम्पिकचे यजमानपद रिओकडे सोपविण्याच्या बदल्यात मते खरेदी करण्यासाठी जी लाच देण्यात आली त्या आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचाराचा तपास करीत असल्याचे ब्राझील पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा सांगितले. यासंदर्भात अनेक देशांमध्ये गेले नऊ महिने तपास करण्यात आला. त्यातून काही गडबड असल्याचे निष्पन्न होत आहे. ब्राझीलच्या आॅलिम्पिक संघटनेचे प्रमुख कार्लोस नुजमॅन यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले असून त्यांच्या निवासस्थानाचीदेखील झडती घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. नुजमॅन यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी अद्याप त्यांना औपचारिक अटक झालेली नाही. त्यांचा पासपोर्टदेखील जप्त करण्यात आला. याशिवाय एक व्यापारी आर्थर सोरेस याच्या अटकेचे वॉरंट काढण्यात आले आहेत. याच व्यापाºयाला रिओ सरकारने आॅलिम्पिक आयोजनातील मोठ्या रकमेचे ठेके दिले होते. या व्यापाºयाची माजी सहकारी असलेली एलियेने कावालकेंटे या महिलेलादेखील रिओ येथे अटक करण्यात आली आहे. स्वित्झर्लंडच्या लुसाने शहरात असलेल्या आयओसी मुख्यालयाच्या एका प्रवक्त्याने या प्रकारावर आश्चर्य व्यक्त करताना सांगितले, ‘आयओसीला मीडियाद्वारे या प्रकाराची माहिती मिळाली. आम्ही सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करीत आहोत.’ (वृत्तसंस्था)