शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

रिओ : महिला हॉकी सामन्यात भारताचा ३-०ने पराभव

By admin | Updated: August 9, 2016 06:31 IST

इंग्लंडने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करताना भारतावर ३-० ने केली मात केली. या पराभवामुळे ब गटात भारत एक गुणासह चौथ्या स्थानवर घसरला

ऑनलाइन लोकमतरिओ दी जानिरो, दि. ९ - रिओ ऑलिम्पिकचा तिसरा दिवस भारतासाठी निराशजनकच ठरला, अभिनव बिंद्राला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. पदकाची आशा त्यामुळे दुळीस मिळाला. महिला हॉकीच्या ब गटातील दुसऱ्या सामन्यात भारताला आज पराभाला सामोरे जावं लागल. भारताने आज निराशजनक खेल केला. इंग्लंडने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करताना भारतावर ३-० ने केली मात केली. या पराभवामुळे ब गटात भारत एक गुणासह चौथ्या स्थानवर घसरला तर इंग्लड अग्रस्थानी पोहचला आहे. भारताचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. तब्बल 36 वर्षांनी ऑलिंपिकमध्ये पुनरागमन करणाऱ्या भारतीय महिलांनी हॉकीत रविवारी पहिल्या सामन्यात जपानला बरोबरीत रोखले होते. आक्रमण हेच सूत्र अवलंबून खेळणाऱ्या इंग्लडच्या महिलांनी सामन्याच्या सुरवातीपासूनच भारतीय खेळाडूंवर दडपण वाढवले. इंग्लडने सामन्याच्या १५ व्या आणि २४ व्या मिनिटाला गोल करत सामन्यात आघाडी घेतली. पहिल्या हाफमध्ये इंग्लडने २-० ने पछाडत सामन्यात निर्वाधित वर्चस्व मिळवले. दुसऱ्या हाफमध्ये भारतावर ते वर्चस्व राखत तिसरा गोल केला. संपुर्ण सामन्यात भारतीय संघात आक्रमण धारदार झालेच नाही. ब गटातील सामन्यात पहिल्या क्वॉर्टरमध्ये दोन्हीसघांला एकही गोल करता आला नाही. मात्र दुसर्या क्वॉर्टरच्या तिसऱ्या मिनिटालाच गोल करत इंग्लडने भारतावर आघाडी मिळवली. २५ व्या मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर इंग्लडच्या जिसेल एन्स्लीने गेल करत आघाडी भक्कम केली. तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये इंग्लडने अधिक धारधार खेळ केला. अ‍ॅलेक्साड्रा डेनसने ३३ व्या मिनिटाला गोल करत भारतावरील आघाडी अधिक भक्कम केला. चौथ्या क्वॉर्टर मध्ये भारताला सामन्यात परतण्याची संधी होती. भारताला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले होते. मात्र भारताला त्याचा फायदा उचलता आला नाही. दोन्हीवेळी भारताच्या पदरी निराशाच आली.